काय सांगता ! होय, पुणे पोलिसांनी तरुणाला दिलं चक्क ‘Rose Day’चं ‘गिफ्ट’

पुणे : पोलीसानामा ऑनलाइन – पुणे शहरात पोलिसांकडून हेल्मेट वापराबाबत जागृकता निर्माण केली जात आहेत. त्यासाठी पुणे पोलिसांकडून कल्पक युक्त्या वापरल्या जात आहेत आणि वाहन चालकांना वाहन चालवताना हेल्मेट घालण्यासाठी प्रोस्ताहित केले जात आहे. काही जणांना अनेकदा अनुभव आला असेल की ते रोज वाहन चालवताना हेल्मेट वापरतात, परंतु जेव्हा एखाद्या दिवशी हेल्मेट घरी किंवा ऑफिसमध्ये विसरते किंवा काही कारणाने हेल्मेट घालणे राहून जाते तेव्हाच नेमकं पोलीस पकडतात. असाच काहीसा प्रकार पुण्यातील एका तरुणासोबत घडला आणि पोलिसांनी या तरुणाला चक्क एक ‘रोज डे’च गिफ्टच दिले.

या तरुणाचे हेल्मेट एका अपघातात फुटले आणि हा तरुण विद्यार्थी असल्याने त्यांच्याकडील महिन्याला वापरण्यासाठीचा खर्च संपला होता. त्यामुळे या तरुणाने प्रामाणिकपणे पुणे पोलिसांनी ट्विट करत आपले हेल्मेट तुटल्याचे आणि काही दिवस आपण हेल्मेट घालू शकत नाही असे सांगितले आणि असेही स्पष्ट केले की तो पुढील महिन्यात नक्की नवे हेल्मेट घेईल.

विशेष म्हणजे या तरुणांच्या ट्विटची दखल पुणे पोलिसांनी घेतली आणि या तरुण विद्यार्थ्यांला पुणे पोलिसांनी ट्विट केले. या ट्विटमध्ये पुणे पोलिसांनी म्हणले की रोज डे आहे, आम्ही तुम्हाला एक गिफ्ट देऊ इच्छितो. ज्यामुळे तुम्हाला रोज रोज आठवण येईल की आमचे प्रेम तुमच्या सुरक्षेसाठी आहे. तुमचे हेल्मेट पुणे पोलीस आयुक्तालयात आणून ठेवण्यात आले आहे. सोमवारी या आणि घेऊन जा. या ट्विटमध्ये पुणे पोलिसांनी #MakeSafetyYourValentine असा हॅशटॅग देखील वापरला आहे.

पुणे पोलीस पुणेकरांच्या सुरक्षासाठी प्रेमाचा जो हात देत आहेत आणि जी सतर्कता दाखवत आहे हे पाहून सोशल मीडियावर देखील पुणे पोलिसांचे अनेकांकडून कौतूक करण्यात येत आहे.