Sindhudurg Bank Election Results | ‘नारायण राणेंनी जत्रेतली कुस्ती जिंकुन ‘हिंद केसरी’ जिंकल्याचा आव आणू नये’

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर (Sindhudurg Bank Election Results) सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) खास करुन नारायण राणे (Narayan Rane) समर्थकांमध्ये सुरु झालेली टीकाटिप्पणी थांबायचे नावच घेत नाही. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurg Bank Election Results) राणे गटाने विरोधकांचा पराभव केल्यानंतर राणे समर्थकांनी एक व्यंगचित्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करुन शिवसेनेला (Shivsena) डिवचलं आहे. या टीकेला गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी गावकडचा दाखला देऊन अत्यंत खोचक उत्तर दिलं आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्हा बाँकेच्या निवडणुकीत (Sindhudurg Bank Election) भाजप पुरस्कृत पॅनलनं सत्ताधारी महाविकास आघाडीचा पराभव केला. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहे. राणे समर्थकांनी शनिवारी सकाळी सोशल मीडियावर एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत शिरणाऱ्या वाघाची शेपटी धरून त्याला नारायण राणे फरपटत नेत असल्याचं यामध्ये दिसत आहे. हा वाघ मांजरीसारखा दाखवण्यात आला आहे. या फोटोच्या माध्यमातून राणे समर्थकांनी शिवसेनेची खिल्ली उडविली आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर पत्रकारांनी शंभुराज देसाई यांना विचारलं असता त्यांनी राणेंना सणसणीत टोला लगावला.

शंभुराज देसाई म्हणाले, पूर्वी गावच्या जत्रेत नारळावरच्या आणि बत्ताशावरच्या कुस्त्या व्हायच्या.
ती कुस्ती जिंकायची आणि हिंद केसरीला (Hindkesari) लढत दिली असं सांगायचं हा केविलवाणा प्रयत्न आहे.
राणे सारख्या केंद्रीय मंत्र्याला (Union Minister) हे शोभत नाही. ही मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती.
खूप मर्यादित मतदारांची निवडणूक होती. सार्वत्रिक निवडणुकीत पुढं या, लोकमताचा कौल घ्यायला पुढं या,
मग कोकणातली आणि सिंधुदुर्गातील शिवसेना काय आहे नारायण राणे यांना कळेल.

 

 

Web Title :- Sindhudurg Bank Election Results | sindhudurg bank election results shambhuraj desai taunts union minister narayan rane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | 76 वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस देऊन प्लॅस्टिक पिशवीत चेहरा घालून खून, नातेवाईकांना मेसेज पाठवून आरोपी इंजिनिअर मुलाची आत्महत्या; पुणे शहरात खळबळ

Nawab Malik-NCB | ‘एनसीबीचा फर्जीवाडा सुरुच, भाजपचे मोठे नेते गृहमंत्रालयात करताहेत लॉबिंग’, कथित ऑडिओ क्लिप ऐकवली; नवाब मलिकांचा गंभीर आरोप (व्हिडिओ)

Early Bird Benefit Scheme | महाराष्ट्र सरकारने 31 मार्चपर्यंत वाढवली ‘अर्ली बर्ड बेनिफिट योजना’, ‘या’ वाहनांवर मिळतोय लाभ