तासाभरात गावात न आल्यास मिरवणूक काढतो, कृषी अधिकार्‍याला धमकावतानाचा नितेश राणेंचा Video व्हायरल

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन –  जिल्ह्याचे पालकमंत्री काय अमिताभ बच्चन आहे का, त्याला बघायला जाताय? तासाभरात देवगड लिंगडाळ गावात न आल्यास मिरवणूक काढून इथेच आणतो, अशा शब्दांत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कृषी अधिकाऱ्याला धमकवल्याचा व्हिडीओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

नितेश राणे देवगड तालुक्यातील लिंगडाळ गावात शेतकऱ्यांच्या करण्यासाठी गेले होते. तेव्हा कृषी अधिकारी, तलाठी न आल्याने राणे चांगलेच संतापले. त्यांनी अधिकाऱ्यांना फोन लावला असता अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यात होते. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांनी झापले.

तुम्ही पंचनामे करायला इथे पोहोचले नाहीत, तुम्हाला हजामत करायला ठेवलं आहे का? कसले पंचनामे सुरु आहेत? मी इथे लिंगडाळ गावामध्ये आहे. इथे तुमचा एक अधिकारी पोहोचलेला नाही. पुढच्या एक तासामध्ये पोहोचला नाही तर मी तिथे येतो घ्यायला. एक तासामध्ये इथे लिंगडाळला ये आणि मला फोन कर. तू इथे आला नाहीस ना, मग आणतो बघ तुझी मिरवणूक कशी इथपर्यंत. उठ तिथून पहिला आणि लिंगडाळला ये,” असे राणे यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओत म्हटलेलं दिसत आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंदाजे सहा हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेतीचे नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील एकूण लागवडीच्या २५ ते ३० टक्के भातशेतीचे नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज पालकमंत्री उदय सामंत यांनी वर्तवला.