Sindhudurg Crime | पुण्यातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील पिसे यांचा तारकर्लीच्या समुद्रात बूडून मृत्यू

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – Sindhudurg Crime | मालवणमधील (Malvan) तारकर्ली (Tarkarli) येथे 20 पर्यटकांना (Tourists) घेऊन जाणारी बोट एमटीडीसी रिसॉर्ट (MTDC Resort) येथे किनाऱ्यावर आणत असताना ती बुडाली (Boat Drowning). या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील (Pune News) जुन्नर तालुक्यातील (Junnar Taluka) आळाफाटा (Alaphata) येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील मारुती पिसे Orthopedic Doctor Swapnil Maruti Pise (वय-45) यांचा समुद्रात बुडून मृत्यू (Death) झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.24) (Sindhudurg Crime) घडली आहे. डॉ. पिसे यांच्यासह आकाश भास्करराव देशमुख Akash Bhaskarrao Deshmukh (वय-30 रा. शास्त्रीनगर अकोला) यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आळाफाटा येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील पिसे आपल्या कुटुंबियांसह मालवणमधील तारकर्ली येथे पर्यटनासाठी गेले होते. मंगळवारी सकाळी तारकर्लीच्या समुद्र किनाऱ्यावरुन 20 जणांना घेऊन बोट स्कुबा डायव्हिंगसाठी (Scuba Diving) गेली होती. स्कुबा डायव्हिंग झाल्यानंतर तेथून परत येत असताना ही दुर्घटना घडली. ही बोट समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच अचानक उलटली. (Sindhudurg Crime)
जखमी झालेल्यांची नावे
रश्मी निलेश कासुल (वय-45 रा. ऐरोली, नवी मुंबई), संतोष यशवंतराव (वय-38 रा. बोरिवली), मृणाल मनिष यशवंतराव (वय-8) ग्रंथ मनिष यशवंतराव (वय दीड वर्षे), वियोम संतोष यशवंतराव (वय- साडेचार वर्षे सर्व रा. बोरिवली), डॉ. अविनाश झांटये, वैभव रामचंद्र सावंत (वय-40 रा. वायरी तारकर्ली), उदय भावे (वय-40 ऐरोली नवी मुंबई) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शुभम गजानन कोरगावकर (वय-22), शुभांगी गजानन कोरगावकर (वय-26 दोघे रा. केरवडे, कुडाळ), लैलेश प्रदिप परब (वय-30) अश्विनी लैलेश परब (वय-30 रा. कुडाळ), मुग्धा मनिष यशवंतराव (वय-40), मनिष यशवंतराव (वय-40) आयुक्ती यशवंतराव (वय-31 रा. बोरिवली), सुशांत आण्णासो धुमाळे (वय-32) गितांजली धुमाळे (वय-28 दोघे रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर), प्रियन संदिप राडे (वय-14 रा. प्रज्ञानंद नगर, पुणे), सुप्रिया पिसे (वय-31 रा. पुणे) यांना प्राथमिक उपचार देवून घरी सोडण्यात आले.
Web Title : Sindhudurg Crime | well known orthopedic doctor Dr. Swapnil Maruti Pisedied in tarkarli boat drowning mishap tarkarli beach Sindhudurg Crime
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर
लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त