Sindhudurg District Bank Election Result | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक; राणे समर्थकांचा महाविकास आघाडीला दणका

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – Sindhudurg District Bank Election Result | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी (Sindhudurg District Bank Election Result) सुरु झाली असून सुरुवातीलाच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपमध्ये (BJP) अटीतटीची लढत पाहायला मिळाली. संतोष परब (Santosh Parab) हल्लाप्रकरणात आरोपी असलेले भाजपचे वेंगुर्ला तालुका प्रमुख मनिष दळवी (Manish Dalvi) आणि कणकवलीमध्ये विठ्ठल देसाई (Vitthal Desai) विजयी झाल्याने महाविकास आघाडीला दोन मोठे धक्के बसले आहेत.

 

विशेष म्हणजे या निवडणुकीत मनीष दळवी यांना सत्र न्यायालयाने (District Sessions Court) मतदानाचा हक्क नाकारला होता. तर कणकवलीत जिल्हा बँकेचे शिवसेनेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) आणि विठ्ठल देसाई यांना समान मते मिळावी होती. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर चिठ्ठीच्या सहाय्याने निकाल लावण्यात आला, त्यामध्ये विठ्ठल देसाई (Vitthal Desai) यांचा विजय झाला. दरम्यान, सतीश सावंत यांचा पराभव होताच राणे समर्थकांनी एकच जल्लोष केला. यावेळी राणे समर्थकांनी ‘राणे साहेबांचा नाद करायचा नाय,’ ‘नितेश राणे बस नाम ही काफी है,’ अशा घोषणा दिल्याने सपूर्ण परिसर दणाणून गेला होता. (Sindhudurg District Bank Election Result)

जिल्हा बँकेबरोबरच कणकवली विकास संस्थेवर (Kankavli Vikas Sanstha) कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कणकवली तालुक्यात 165 पैकी 161 जणांनी मतदान केले होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मतदार असलेले संदेश उर्फ गोट्या सावंत (Sandesh Sawant) यांची दोन मते, बेपत्ता असलेले विकास संस्थेचे मतदार प्रमोद वायंगणकर (Pramod Waingankar) आणि आजारी असलेले सुरेश सावंत (Suresh Sawant) असे 4 मतदार मतदानाचा हक्क बजावू शकले नव्हते. तर मतदानावेळी एका केंद्रावर बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) आणि जिल्हा परिषद सदस्या संजना सावंत (Sanjana Sawant) यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यामुळे कोण निवडून येणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या जागेवर लागले होते. मात्र सतीश सावंत यांना धक्का देण्यात नारायण राणे यांच्या गटाला (Narayan Rane Group) यश आले आहे.

 

Web Title :- Sindhudurg District Bank Election Result | shivsena leader satish sawant defeated in sindhudurg district bank election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

GST कौन्सिलच्या बैठकीत मोठा निर्णय ! टेक्सटाईलवर 5 टक्केच लागणार जीएसटी : सूत्र

Pune Crime | पुण्याच्या गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांच्या आत्म्हत्येचं कारण आलं समोर

MLA Nitesh Rane | नितेश राणेंची माहिती देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस; मुंबईतील चर्चगेट स्थानकाबाहेर लावले बॅनर