Sindhudurg District Bank Election | ‘ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात जनतेने जिल्हा बँक दिली’, नारायण राणे यांचा महाविकास आघाडीवर घणाघात

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – सिंधुदुर्गच्या जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurg District Bank Election) आज भाजप (BJP) पुरस्कृत पॅनलने 19 पैकी 11 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या मेहनतीला यश मिळालं असून या विजयाचं श्रेय जनता, भाजपचे कार्यकर्ते यांना जातं अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिली. तसेच ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक लोकांनी दिली आहे. ही माझी नाही तर भाजपची सत्ता असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. (Sindhudurg District Bank Election)

भाजप नेते राजन तेली (BJP Leader Rajan Teli) यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, दिल्लीपर्यंत सत्ता आमची आहे, त्यामुळे जिल्हा बँकेत पराभव झालेल्या राजन तेलींची वर्णी लावू असं आश्वासन राणे यांनी दिली. तसेच सिंधुदुर्गच्या निवडणुकीनंतर आता राज्यात भाजपची सत्ता आणणार असल्याचं सांगत राज्यात भाजपची सत्ता हवीय, ‘लगान’ची (Lagaan) नको असा टोला महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) लगावला. (Sindhudurg District Bank Election)

बारामतीला बँकेतून कर्ज मिळणार नाही

मुख्यमंत्र्यांवर (CM) निशाणा साधताना राणे म्हणाले, राज्याला मुख्यमंत्री नसून, राज्य अधोगतीच्या मार्गावर असल्याचंही त्यांनी म्हटले. तसेच राज्याला आता भाजपचा मुख्यमंत्री पाहिजे असल्याचे सांगितले. जिल्हा बँक ही स्थानिक शेतकऱ्यांसाठी असून, त्यांच्यासाठीच काम केलं जाईल. तसेच बारामतीसाठी (Baramati) आता या बँकेतून कर्ज दिलं जाणार नाही. बँकेच्या निवडणुकीत तीन पक्ष एकत्र आले तरी ते जिंकू शकले नाहीत, ज्यांचे चेहरे सुद्धा पाहावत नाहीत, त्यांना लोक संधी देणार नसल्याचे राणे यांनी म्हटले.

36 मंत मिळवू शकत नाही अन्..

त्यांनी कुठली धनलक्ष्मी वाटली ?  त्यांनी बँकेचे किंवा भ्रष्टाचाराचे मिळवलेले पैसे असतील. त्यामुळे त्याचं काही गेलं नाही. जे काही गेलं ते बँकेचं गेलं. त्यांची अवकात नाही. 36 मतं मिळवू शकत नाहीत आणि विधानसभेच्या गोष्टी करत करतात, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.

Web Title : Sindhudurg District Bank Election | sindhudurg district bank election narayan rane slams mahavikas aghadi and shivsena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात नागरिकांना त्रास देणार्‍या गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला ! येरवडा पोलिसांचा स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार

Government Scheme | ‘ही’ सरकारी योजना माजी सैनिकांच्या मुलींच्या लग्नासाठी देते 50,000 ची रक्कम; जाणून घ्या कसा मिळेल लाभ

Employees Pension Scheme | 300% पर्यंत वाढू शकते पेन्शन ! 7500 रुपयांवरून वाढून 25000 रुपये होईल पेन्शन, जाणून घ्या गणित

Multibagger Penny stock | 15 महिन्यात 1 लाखाचे झाले 68 लाख, टाटा ग्रुपची आहे कंपनी

Gram Ujala Scheme | 12 वॅट LED बल्ब अवघ्या 10 रुपयात! जाणून घ्या पूर्ण योजना आणि लाभ घेण्याची शेवटची तारीख