Sindhutai Sapkal | दिवंगत पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेच्या नावाने नागरिकांची ऑनलाईन फसवणूक, राज्यभरात नागरिकांची फसवणूक झाल्याचा संशय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांनी मुलांसाठी अनेक संस्था सुरु केल्या आहे. सिंधुताई यांनी अनाथ आश्रमातील (Orphanage) अनेक मुलींची लग्न लावून दिली आहेत. याचाच फायदा घेत काही भामट्यांनी सिंधुताई संपकाळ (Sindhutai Sapkal) यांच्या संस्थेच्या नावावर गोरखधंदा सुरु केल्याचे समोर आले आहे. आमच्याकडे लग्नासाठी मुली (Girls for Marriage) आहेत, असे सांगून अनेक नागरिकांकडून ऑनलाइन पैसे (Online Money) घेऊन फसवणूक (Fraud) केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भामट्यांचे जाळे देशभरात पसरले असल्याची शक्यता असून अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांच्या संस्थेतील अनाथ मुलींची लग्न जमवण्यासाठी ऑनलाईन पैसे उकळले जात आहेत. राज्याभरात मुंबई (Mumbai), पुणे (Pune) मध्य प्रदेशातील इंदोर मध्ये अशा प्रकारची फसवणूक करुन पैसे उकळण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी माई पद्मश्री सिंधुताई सपकाळ संस्थेकडून (Mai Padmashri Sindhutai Sapkal Sanstha) नागरीकांनी फसवणुकीला बळी न पडण्याचे आवाहन विनय सिंधुताई सपकाळ (Vinay Sindhutai Sapkal) यांनी केले आहे. त्याशिवाय अशा प्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी असे आवाहन केले आहे.

माई पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेतून बोलत असल्याचे सांगून नागरिकांना आमच्याकडे
लग्नासाठी मुली आहेत असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले जात आहेत.
याबाबत संस्थेने पोलिसांकडे तक्रर केली असून नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये.
तसेच मुलींच्या लग्नासाठी माईंच्या संस्थेकडून पैसे मागितले जात नाही किंवा बाँड पेपरवर सह्या घेतल्या जात नाही.
याशिवाय सध्या संस्थेमध्ये विवाह योग्य वयाच्या मुली नसून कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन विनय सपकाळ यांनी केले आहे.

दरम्यान, आरोपींनी एका व्यक्तीला सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेच्या नावाने पैसे मागून 11 हजार रुपयांचा गंडा
घातल्याचा प्रकार समोर आल्याचे विनय सपकाळ यांनी सांगितले.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून संस्थेच्या नावाने अन्न धान्य मागितले जात असल्याचे देखील समोर आले आहे.

विनय सिंधुताई सपकाळ यांनी सांगितले की, माई सुंधुताई सपकाळ यांच्या संस्थेचे नावाने मुलींच्या लग्नाची बतावणी केली जात आहे.
यासाठी नागरिकांकडून ऑनलाईन पैसे उकळले जात आहेत.
प्रमुख्याने पुणे शहरातील हडपसर, कोथरुड, जळगाव, संभाजीनगर याठिकाणी फसवणूक झाल्याचे समजते.
तसेच मुंबईत देखील पैसे आणि धान्य गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title :- Sindhutai Sapkal | Online fraud of citizens in the name of late Padmashri Sindhutai Sapkal’s organization, suspicion of cheating citizens across the state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | मुलाच्या ऑपरेशनचा बहाणा करुन पैसे घेऊन केली फसवणूक; वडिल मुलीवर गुन्हा दाखल, मृत्यु पावलेल्या पतीच्या केल्या खोट्या सह्या

Home Remedy For Hair Fall | केस गळती थांबेल ताबडतोब, उगवतील नवीन केस, केवळ ‘या’ 3 तेलाने करा मालिश

Kitchen Hacks | कोथिंबीर फ्रिजमध्ये ठेवूनही सुकते का? ‘या’ 4 पद्धतीने फ्रेश राहतील भाज्या