गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांना मातृशोक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – दिवंगत नेते पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या धर्मपत्नी व गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मातोश्री सिंधुताई विखे पाटील यांचे आज सकाळी पावणेसहा वाजता निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

सिंधूताई विखे यांच्यावर आज दुपारी 12 वाजता प्रवरा कारखाना येथे अंत्यसंस्कार होणार आहे. सिंधूताई विखे या वयोवृद्ध असल्याने काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज सकाळी त्यांचे निधन झाले. जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या सासू व खासदार सुजय विखे यांच्या त्या आजी आहेत.

सिंधूताई यांच्या मृत्यूची बातमी समजताच अनेकांनी लोणीकडे धाव घेतली. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

You might also like