बुलढाणा जिल्ह्यात नगरपरिषदांचे संमिश्र निकाल

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा नगर परिषदेवर सेना भाजपचा भगवा झेंडा फडकला असून शिवसेनेचे सतीश तायडे हे तेथून निवडून आले आहेत. सतीश तायडे यांनी राष्ट्रवादीच्या देविदास ठाकरे यांचा पराभव केला आहे. तर तिकडे लोणार नगरपरिषदेवर काँग्रेसने एकहाती सत्ता संपादित केली आहे. एकंदरच बुलढाणा जिल्ह्याच्या नगरपरिषदांचे निकाल हे संमिश्र स्वरूपाचे लागले आहेत.

सिंदखेड राजा नगर परिषदेत शिवसेनेने सात जागी विजय मिळवला असून राष्ट्रवादीने आठ जागी विजय मिळवला आहे. तसेच सिंदखेड राजा मध्ये एक अपक्ष देखील निवडून आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. सिंदखेड राजा या ठिकणी राष्ट्रवादीची एक जागा अधिक निवडून आली आहे. मात्र नगराध्यक्ष पद शिवसेनेच जिंकले आहे.

सिंदखेड राजाचे माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि आमदार शशिकांत खेडेकर यांनी हि निवडणूक अत्यंत प्रतिष्ठीची बनवली होती. ती निवडणूक काही प्रमाणत शिवसेनेने तर काही प्रमाणात राष्ट्रवादीने जिंकली आहे. तर तिकडे लोणारमध्ये दर निवडणुकीला सत्ता पालट हे ठरलेले असते. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला सत्ता कायम राखण्यात यश आले आहे. जनतेने कोणत्याच पक्षाला नगरपालिकेची सत्ता दोन वेळा दिली नव्हती मात्र यावेळी काँग्रेसने ती परंपरा मोडून काढली आहे. पुनम मनिष पाटोळे या लोणारच्या नगराध्यक्ष पदी विजयी झाल्या आहेत. तर १० जागी काँग्रेस तर ७ जागी शिवसेना विजयी झाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like