अदनान सामीच्या ट्विटने ‘खळबळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड गायक अदनान सामी याच्या एका ट्विटमुळे सध्या सोशल मीडियावर मोठा हंगाम उडाला आहे. अदनान सामी याने या ट्विटमध्ये भारत आणि पाकिस्तानसंबंधी तुलना करून एक भाष्य केले आहे. त्याच्या या ट्विटनंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात असून त्याला नेटिझन्सनी तिखट प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले आहे.

अदनान सामी याने या ट्विटमध्ये म्हटले कि, भारतात बीफ आणि पाकिस्तानमध्ये दारू सहज उपलब्ध होते. यामध्ये त्याने पाकिस्तानवर टीका करत हे ट्विट केले आहे. त्यामुळे त्याला नेटिझन्सच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. या ट्विटमध्ये त्याने म्हटले कि, एक गोष्ट तर साफ आहे कि, ज्या प्रकारे भारतात बीफ कुठेही मिळते, तसेच इस्लामिक देश पाकिस्तानमध्ये देखील दारू सहज उपलब्ध होते. त्यामुळे त्याला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले.

दरम्यान, पाकिस्तानी गायक असणाऱ्या अदनान सामी याने २०१६ मध्ये भारतीय नागरिकता स्वीकारली होती. तेव्हापासून तो भारतात वास्तव्यास आहे. त्याचा जन्म हा ब्रिटनमध्ये झाला असून तो बॉलिवूडबरोबरच खासगी अल्बममध्ये देखील गाणे गातो.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like