‘जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला’ फेम गायक आनंद शिंदेंची राजकारणात ‘एन्ट्री’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जवा नवीन पोपट हा फेम आनंद शिंदे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. आनंद शिंदे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी स्वीकारली आहे. सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ आणि सोलापूर शहर मध्ये हे मतदारसंघ राखीव असून शिंदे आगमी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

आनंद शिंदे आणि त्यांचा मुलगा डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न केले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे पिता-पुत्राला विधानसभेची ऑफर दिली होती. एक आठवड्यापूर्वी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ठाकरे यांनी शिंदे यांना ही ऑफऱ दिल्याचे बोललं जात होतं. मात्र, या बैठकीत आनंद शिंदे यांनी आपल्याला निवडणूक लढवण्यात रस नसल्याचे सांगितले होते. शिवसेनेबरोबरच शिंते पिता-पुत्रांना राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आणि एमआयएम पक्षांनी त्यांना आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न केला होता.

महाराष्ट्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची स्थापना 2012 मध्ये झाली. या पक्षाचे संस्थापक मनोज संसारे असून याआधी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सुषमा आंधारे यांच्यावर होती. मनोज शिंदे यांनी पक्ष प्रवेशावर बोलाताना म्हणाले, भाजपा-शिवसेना युती रोखणे ही आमची भूमिका आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सध्या ठराविक मतददारसंघाचा विचार केला नाही. पण पक्षबांधणीसाठी राज्यभर दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा विचार करणार असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले.

आरोग्यविषयक वृत्त –