‘वरमाला’पासून ते 7 फेरे ! पाहा आदित्य नारायणच्या लग्नाचे फोटो अन् व्हिडिओ

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील फेमस सिंगर उदित नारायण (Udit Narayan) यांचा मुलगा आदित्य नारायण (Aditya Narayan) यानं आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. आदित्य लग्नबंधनात अडकला आहे. आदित्य आणि त्याची लाँग टाईम गर्लफ्रेंड अ‍ॅक्ट्रेस श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) यांनी 1 डिसेंबर रोजी लग्न केलं आहे.

आदित्य आणि श्वेता यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दोघं खूप सुंदर आणि आनंदी दिसत आहेत.

आदित्य आणि श्वेता ब्राईडल आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. दोघांनीही कलर कॉर्डिनेट आउटफिट कॅरी केला आहे. आदित्यनं क्रीम कलरच्या शेरवानीवर बेबी पिंक कलरचा दुपट्टा टीमअप केला आहे.

श्वेतानं पिंकीश आणि क्रीम कलरचा लहंगा घातला आहे. तिनं कुंदनची ज्वेलरीही परिधान केली आहे. लाँग ईयरिंग माथ्यावर पट्टी, हेवी नेकलेस अशा लुकमध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत आहे.

आदित्य आणि श्वेता यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

अलीकडेच आदित्यनं श्वेतासोबतचा फोटो शेअर करत लिहिलं होतं की, आम्ही लग्न करणार आहोत. मी जगातील सर्वांत लकी माणूस आहे ज्याला 11 वर्षांपूर्वी श्वेता भेटली. माझी सोलमेट. आता फायनली आम्ही डिसेंबरमध्ये लग्न करत आहोत. आम्हाला दोघांनाही आमचं खासगी आयुष्य खासगी ठेवायला जास्त आवडतं. लग्नाच्या तयारीसाठी आता सोशल मीडियावरून ब्रेक घेत आहे. आता डिसेंबरमध्ये भेटूयात.

You might also like