‘लॉकडाऊन’मध्ये ‘सिंगर’ आशा भोसलेंचा युट्युबवर ‘डेब्यू’ ! जाणून घ्या कोणाला समर्पित केलं पहिलं गाणं

पोलिसनामा ऑनलाइन –हिंदी सिनेमातील सिंगर आशा भोसले यांनी एक नवीन सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमध्ये त्यांनी स्वत:चा युट्युब चॅनल लाँच केला आहे. पहिलं गाणं त्यांनी अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांना समर्पित केलं आहे. आशानं सांगितलं की, त्यांना यासाठी त्यांच्या नातीनं प्रेरणा दिली आहे.

आशा भोसले यांनी बुधवारी(दि13 मे) रात्री 9 वाजता आपला युट्युब चॅनल सुरू केला. एका वृत्तसंस्थेशी बोलताना आशा यांनी सांगितलं की, “सध्याची स्थिती पाहता सर्वजण घरात आहेत. आपल्य नातवंडांसोबत ते नेटच्या साहाय्यानं कनेक्टेड आहेत. हे पाहून माझ्यासाठीही या नव्या संधीचे दरवाजे उघडले आहेत.”

आशा पुढे म्हणतात, “अनेक वर्षांपासून मला अनेक लोक माझे अनुभव माझ्या भावना यावर लिहायला सांगत आहेत. परंतु माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. आता घरी आहे तर 86 वर्षांच्या अनुभवांना रेकॉर्ड करणार आहे. यातून लोक खुश होतील आणि त्यांचं मनोरंजनही होईल.”

आशा सांगतात की, नातीला पाहिल्यानंतर त्यांना त्यांच्या जमान्याची आठवण येते. त्यांची नात जनाई लिहिते, गाते, संगीत देते. ती कथ्थक डान्सरही आहे.