मुंबई-पुणे एक्सप्रेसवर गायक हिमेश रेशमियाच्या कारचा अपघात

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक, म्यूजिशियन आणि अभिनेता हिमेश रेशमिया याच्या कारचा ॲक्सिडंट झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना मुंबई-पुणे एक्सप्रेसवर घडली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार या ॲक्सिडंटमध्ये हिमेश रेशमियाचा ड्रायव्हर राम कंजन खूप जखमी झाला आहे. राम रंजन हा बिहारचा आहे.

ही घटना कशी घडली आणि हिमेश रेशमिया हालत कशी आहे ? याची माहिती अद्याप कळाली नाही. सध्या हिमेश सोनी चॅनलवर प्रसिद्ध असलेल्या टिव्ही सुपर सिंगर शो ला जज करत आहे. हिमेशसोबत अलका याग्निक आणि जावेद अली शो जज करत आहेत. याआधी हिमेश ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स, द वॉयर ऑफ इंडिया किड्स’ शो ला जज केले आहे.

View this post on Instagram

Love you all! 🖤

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh) on

हिमेश रेशमिया बॉलिवूडचे प्रसिद्ध नाव आहे. सलमान खानने हिमेश रेशमियाला ब्रेक दिला होता. हिमेशने अनेकदा सलमान खानला या गोष्टींसाठी क्रेडिट दिले आहे. हिमेशने सलमान खानचा चित्रपट ‘प्यार किया तो डरना क्या’ मधून पदार्पण केले होते.

View this post on Instagram

#Gwalior for #LoveMeIndia's Concert Tonight!

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh) on

रियालिटी शो जज करण्याव्यतिरिक्त हिमेश चित्रपटांमध्ये ही सक्रिय आहे. तो अपकमिंग चित्रपट ‘सूर्यवंशी’ आणि ‘गुडन्यूज’ चित्रपटाचा म्यूझिक डायरेक्टर आहे. हिमेश ने तेरा सुरूर, आप का सुरूर, कर्ज, रेडियो, खिलाडी ७८६ अशा अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. हिमेश मोठ्या पडद्यावर चित्रपट ‘मैं जहां रहू’ मधून कमबॅक करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश सेठी करणार आहे.

 

 

 

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like