लंडनमध्ये प्रिन्स चार्ल्सला भेटली ‘सिंगर’ कनिका कपूर ? प्रिन्सच्या COVID 19 ची ‘लागण’ झाल्यानंतर फोटो ‘व्हायरल’

ब्रिटेनच्या प्रिन्स चार्ल्सला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाल्याचं समोर आल्यानंतर आता सिंगर कनिका कपूरसोबतचा त्यांचा फोटो आता सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. युजर्स हे फोटो शेअर करत तऱ्हेतऱ्हेच्या कमेंट करताना दिसत आहेत. तसं पाहिलं तर हा फोटो जुना असून कनिकाच्या इंस्टावरही उपलब्ध आहे.

ब्रिटेनच्या प्रिन्स चार्ल्समध्ये कोरोनाची किरकोळ लक्षणं आढळली आहेत. त्यांची प्रकृती ठिक आहे. त्यांची पत्नी कॅमिला हिला लागण झालेली नाही. सध्या दोघंही पती पत्नी आयसोलेशनमध्ये आहे. जेव्हा कनिकाला कोरोनाची लागण झाली होती तेव्हा तिची ट्रॅव्हल हिस्ट्री लंडनची होती. 9 मार्च 2020 रोजी कनिका लंडनहून मुंबईत आली होती. यानंतर ती लखनऊला गेली होती. लंडन कनेक्शनमुळं आता युजर कनिकचा हा फोटो शेअर करताना दिसत आहेत. हा फोटो 2015 मधील आहे. फोटोत दिसत आहे की, कनिका स्माईल करत प्रिन्स चार्ल्स सोबत बोलत आहे. तिचा आणखी एक सेल्फी आहे ज्यात कनिका पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दिसत आहे.

कनिका मूळची लखनऊची आहे. 1997 मध्ये ती लग्न करून लंडनला गेली होती. 2012 मध्ये कनिकाचा घटस्फोट झाला होता. यानंतर ती मुंबईत आली होती. इथं तिनं सिंगिंगमध्ये नशीब आजमावलं. तिनं बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी दिली आहेत.

View this post on Instagram

#SelfieWithModi #London #ModiInUK #dinner ⭐️

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

You might also like