गायक दलेर मेहंदी भाजपमध्ये दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आतापर्यंत राजकरणात अनेक सिलिब्रेटींनी प्रवेश केला आहे. त्यापैकी उर्मिला मातोंडकर, गौतम गंभीर यासारख्यांना तर पक्षांची उमेदवारी देखील देण्यात आली आहे. आता प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांनी देखील राजकारणात एंट्री केली आहे. दिलेर मेहंदी यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.

दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघातून भाजप उमेदवार हंसराज हंस, केंद्रीय मंत्री आणि चंदनी चौकाचे उमेदवार हर्षवर्धन तसेच पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. याबाबतचे ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

काही दिवसांपूर्वी हंसराज हंस भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यांनंतर भाजपानं त्यांना उत्तर पश्चिम दिल्ली मतदार संघातून तिकीट देऊन मैदानात उतरवलं आहे. दलेर मेहंदी हे हंसराज हंस यांचे व्याही आहेत. हंसराज हंस यांचा मुलगा नवराज हंस आणि दलेर मेहंदी यांची मुलगी अवजीत कौर २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. १९९५ साली आलेल्या ‘बोलो ता रा रा’ अल्बममुले दलेर मेहंदी प्रकाशझोतात आले होते.