‘सिंगर’ मिका सिंगच्या महिला मॅनेजरची स्टुडिओत आत्महत्या, KRK नं ट्विट करत सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिंगर मिका सिंगच्या मॅनेजरबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. मिकाची मॅनेजर सौम्या हिनं मिकाच्या रेकॉर्डिंग स्टुडिओत आत्महत्या केली आहे. मुंबईतील अंधेरी वेस्टमध्ये हा स्टुडिओ आहे. सौम्यानं झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केल्याचं समजत आहे.

अलीकडेच KRK बॉक्स ऑफिसनं ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. सौम्याचा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलं की, “सिंगर मिका सिंगची मॅनेजर सौम्यानं मिकाच्या मुंबईमधील अंधेरी वेस्टमधील रेकॉर्डिंग स्टुडिओत सुसाईड केलं आहे. RIP. एका वेबासाईटनं आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, तिनं गेल्या आठवड्यात आत्महत्या केली आहे. ज्या स्टुडिओत तिनं आत्महत्या केली तिथेच ती रहात होती.”

वेबसाईटनं सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं आहे की, सौम्यानं झोपेच्या गोळ्यांचा ओवरडोस घेतला आणि सुसाईड केलं. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. सूत्रांनी सांगितलं आहे की, सौम्याचे आई वडिल नव्हते. तिचे आजी आजोबा पंजाबमध्ये राहतात. त्यामुळे मिकानं तिचं पार्थिव पंजाबला नेलं होतं.

मिकाबद्दल बोलायचं झालं तर तो नेहमीच वादात सापडत असतो. त्यानं राखीला किस केल्यानं खप गोंधळ झाला होता. याशिवाय एका ब्राझीलच्या टीनएज मॉडेलनं त्याच्याविरोधात केस दाखल केली होती. मिकानं तिला सेक्शुअली काही मेसेज पाठवले होते असा तिचा आरोप होता.

You might also like