असं काय झालं की गायक शानला पब्लिकमध्ये जावुन सांगावं लागलं ; की, ‘मी भाजपाचा माणून नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  शान हा बॉलिवुडचा प्रसिद्ध गायक आहे. तनहा दिल सह, दिल चाहता है आणि कल हो न हो मध्ये त्याने हिट गाणी गायली आहेत. सारेगामापा चा तो होस्टही होता. शान सध्या चर्चेत आहे. मात्र, गाण्यासाठी नव्हे, तर आपल्या सोशल मीडियावरील एका पोस्टासाठी. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, ही पोस्ट वाचून माझ्याबद्दल अनेक गोष्टी स्पष्ट होतील. यासोबत शानने वृत्तपत्राचा एक स्क्रीनशॉट शेयर केला आहे, ज्याचा मथळा आहे – दीपिका पदुकोणला काउन्टर करण्यासाठी भाजपाने शान आणि तनीषाची केली निवड.

या बाबात उत्तर देताना शान ने म्हटले आहे की,

स्पष्टीकरण

1 भाजपाने माझी निवड केलेली नाही. मला सीएए म्हणजेच नागरिकत्व संशोधन कायदा समजून घेण्यासाठी, शंका निरसण आणि मत मांडण्यासाठी बोलावले होते. आम्ही तेथे भाजपाचे प्रवक्ते नव्हतो, तर नागरिक म्हणून उत्तर शोधण्यासाठी गेलो होतो, आणि याचा मला फायदाही झाला.

2 योगायोगाने मीटिंगही तेव्हाच ठरवली गेली, जेव्हा जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना हिंसक मारहाण करण्यात आली. त्यावेळी मला काहीही माहित नव्हते.

3 दीपिका घटनेनंतर दुसर्‍या दिवशी कँपसमध्ये गेली होती. यामुळे लोकांनी मला घेरण्यास सुरूवात केली, जी घटनानंतर घडली होती.

4 हो, मी हिंसा आणि पोलिसांच्या उदासिनतेमुळे भयभित आहे, आणि विद्यार्थ्यांसोबत आहे. जसे की कुठलीही समजदार व्यक्ती करेल. हे स्पष्ट आहे की, हे वृत्त सत्य परिस्थिती बिघडवत असून दोन वेगळ्या घटनांना एकत्र करत आहे, ज्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. मला आशा आहे की, आता सर्व स्पष्ट होईल.

शान ने असे का लिहिले

रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी बॉलिवूड स्टार्सना सीएएवर चर्चा करण्यासाठी निमंत्रण पाठवले होते. चर्चेसोबत भाजपने 5 जानेवारीला मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये भोजनही ठेवले होते. तनीषा, रणवीर शौरी, शान, दिग्दर्शक अनिल शर्मा हे सुद्धा निमंत्रित होते. जेव्हा सर्वजण मिटींगमधून बाहेर पडले, तेव्हा मिटींगमध्ये काय शिकवण्यात आले, आणि काय समजावण्यात आले हे सांगण्यात आले.

यानंतर लोकांनी सोशन मीडियावर लिहिणे आणि बोलणे सुरू केले की, यामध्ये दिसणारे सेलिब्रिटी जेएनयूतील हिंसेचे समर्थन करत आहेत. काहींनी म्हटले की भाजपा दीपिका आणि अनुराग कश्यपसारख्यांवर टीका करण्यासाठी यांचा उपयोग करणार आहे. काहींनी पेड आर्टिस्ट म्हटले. एकुणच ज्यांना जे वाटते ते लिहिले गेले. काही युजर्सने सोशल मीडियावर शानवर टीका करण्यास सुरूवात केली. यानंतर शान ला पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले.

आता दीपिका पदुकोण आणि अनुराग कश्यप बाबत बोलायचे तर 5 जानेवारीला दिल्ली जेएनयू कॅम्पसमध्ये बुरखा घातलेल्या काही लोकांनी हल्ला केला. विद्यार्थी आणि प्राध्यापकांना बेदम मारहाण केली. तोडफोड केली. सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले.

जेएनयूमध्ये दीपिका
या घटनेनंतर लोकांनी देशभरात निदर्शने सुरू केली. अनुराग कश्यप, अनुभव सिन्हा, स्वरा भास्कर, तापसी पन्नू, फरहान अख्तर, निखिल आडवाणी, महेश भट्ट, शबाना आझमी, जावेद अख्तर यांच्या सारखे सेलिब्रिटी दिल्ली आणि मुंबईतून निदर्शनात सहभागी झाले. या सेलेब्सने सीएएच्या विरोधात निदर्शने केली. 6 जानेवारीला दीपिकासुद्धा जेएनयूमध्ये पोहचली. तिने तेथील विद्यार्थ्यांना समर्थन दिले. यानंतर तिच्या अगामी चित्रपटावरही टीका करण्यात आली. बायकॉट छपाक ट्रेंड सुरू करण्यात आला.

मुंबईत सीएएविरोधातील निदर्शनात सेलिब्रिटी

सीएए आणि जेएनयूतील हिंसेविरोधात बॉलिवुडमध्ये दोन गट पडले आहेत. काही विरोधात तर काही समर्थनात उतरले. आता शान ने सुद्धा त्याची बाजू स्पष्ट केली आहे. यासाठी त्याच्याबाबतीत अफवा पसरविणे चुकीचे आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/