श्रेया घोषालने केला एका एअरलाईवर खोचक मारा, ट्विटद्वारे व्यक्त केला राग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने सोशल मिडियावर एका एअरलाईवर खोचक शब्दाचा मारा केला. असे झाले की, एअरलाइनने गायिका श्रेयाला फ्लाइटमध्ये म्युझिक इस्टुमेंट्ससोबत नेण्यास परवानगी दिली नाही. यागोष्टीवरुन श्रेया नाराज होऊन तिने ट्विट करुन आपला राग व्यक्त केला. तिच्या पोस्टला चाहत्यांनी सहमती दिली आहे.

श्रेयाने ट्विट मध्ये लिहले की, ‘मला वाटते की, सिंगापूरचे एअरलाईनला वाटते की, कोणतेही गायक किंवा गायिकेने आपल्यासोबत महाग इंस्टुमेंटसोबत घेऊन’ प्रवास करु नये. मी धन्यवाद बोलते या गोष्टीसाठी’

ट्विटनंतर एअरलाइने माफी मागत ट्विटमध्ये लिहले की, मला माफ करा श्रेया, मी या गोष्टीसाठी खंत व्यक्त करते. आम्हाला या गोष्टीसाठी अधिक माहिती मिळवण्याची गरज आहे.

या ट्विटला सोशल मिडियावर युजर्सने नाराजगी व्यक्त केली. काही युजर्सने या गायिकेला साथ दिली. एक युजर ने लिहले की, ‘मला सिंगापूरच्या एअरलाइन्सकडून ही अपेक्षा नव्हती.’

एका युजरने श्रेयाला सपोट करुन म्हणाला की, ‘दिदि तुम्ही त्रास करुन घेऊ नका. या समस्येचा मार्ग निघेल. सगळे ठिक होईल.’

You might also like