‘कोरोना’मुळं 1 महिन्यापासून इटलीत अडकली ‘सिंगर’ श्वेता पंडित (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूडमध्ये शेकडो हिट साँग देणारी सिंगर श्वेता पंडित सध्या कोरोना व्हायरसमुळं देशाबाहेर अडकली आहे गेल्या एका महिन्यापासून ती इटलीत फसली आहे. सध्या तिथे लॉकडाऊन असल्यानं ती तिच्या रूममध्येच आहे तेही गेल्या एका महिन्यापासून. श्वेतानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिनं तिचा इटलीतील एका महिन्याचा अनुभव सांगितला आहे. ती घाबरलेली आहे. शिवाय तिला तिच्या पॅरेंट्सची खूप आवठवण येत असल्याचंही तिनं सांगितलं.

पीएम मोदींनी घेतलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या निर्णयाचंही श्वेता पंडित हिनं समर्थन केलं आहे. व्हिडीओत श्वेता म्हणते, “नमस्कार दोस्तांनो जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसबद्दल तुम्हाला माहितीच आहे. भारतातही 21 दिवस लॉकडाऊन आहे. मी खूप खुश आहे. मला तुम्हाला डोळ्यानं पाहिलेलं काही सांगायचं आहे. कोरोनानं ज्या देशात सर्वात जास्त थैमान घातला आहे, ज्या देशात जास्त जीव घेतले आहेत त्याच देशात मी आहे, इटलीत.”

श्वेता पुढे म्हणते, “मी गेल्या एका महिन्यापासून खोलीच्या बाहेर गेलेले नाही. हा एक घातक आजार आहे. डॉक्टर पेशंट पर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना कळतं की, त्याला आयसीयुची गरज आहे. इथं आतापर्यंत 8000 हून अधिक लोक मरण पावले आहेत. मी जेव्हा सकाळी उठते तेव्हा फक्त अ‍ॅम्ब्युलन्सचा आवाज येतो. भारतात माझी खुशाली विचारणारे खूप कॉल्स आले. मी कशी आहे असं त्यांनी विचारलं. त्या सर्वांचे आभार. मी माझ्या पतीसोबत असून पूर्णपणे सुरक्षित आहे.”

श्वेता म्हणते, “मला माझ्या आई-वडिलांची आणि बहिण-भावांची खूप आठवण येत आहे. मला भरतात यायचं होतं परंतु नाही येऊ शकले. या आजारानं मी ग्रस्त व्हावं असं मला अजिबात वाटत नाही. मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही सारे सुरक्षित रहा.”

View this post on Instagram

True Art and True Artist 💙 #shwetapandit

A post shared by SP ✨ (@shwetapandit7) on

View this post on Instagram

Just a little too much love ❣️

A post shared by SP ✨ (@shwetapandit7) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like