पतीपासून वेगळी झाली ‘सिंगर’ सुनिधी चौहान, 8 वर्ष जुनं नातं तुटलं ?

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड सिंगर सुनिधी चौहान आपल्या पर्सनल लाईफमुळं सध्या चर्चेत आली आहे. अशी माहिती आहे की, ती आणि तिचा पती हितेश सोनिक एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. त्यांचं 8 वर्ष जुनं लग्न लॉकडाऊनच्या काळात मोडलं आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून हितेश आणि सुनिधी वेगळे रहात होते. परंतु ही गोष्ट त्यांनी लोकांसमोर येऊ दिली नाही. आता त्यांना याबद्दल काही विचारलं असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी सुनिधी आणि हितेश दोस्तांसोबत गोव्याच्या ट्रीपला गेले होते. तिथून परत आल्यानंतर दोघांमध्ये कटुता आली.

सुनिधी आणि हितेश यांच्या लग्नाबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली आहेत. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये लग्न केलं होतं. हे लग्न गोव्यात एका ग्रँड रिसेप्शनसहित झालं होतं.

लग्नाच्या 5 वर्षांनंतर जानेवाीर 2018 मध्ये सुनिधीनं एका मुलाला जन्म दिला होता. तिनं मुलासोबत अनेकदा फोटो शेअर केले होते. सोशलवरही सुनिधी नेहमीच सक्रिय असते.

सुनिधीचं हे दुसरं लग्न होतं. पहिलं लग्न तिनं 2002 मध्येच केलं होतं जेव्हा ती 18 वर्षांची होती. कोरियोग्राफर बॉबी खानसोबत तिनं पहिलं लग्न केलं होतं. एका वर्षातच दोघं वेगळे झाले होते.