ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आता त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येईल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

हिंदी, मराठीसह त्यांनी भोजपुरी आणि कोकणी भाषेत देखील हजारो गाणी गायली आहेत. आज याचाच गौरव करत त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. पद्मश्रीच्या रुपात सुरेश वाडकर यांच्या स्वरमय कारकिर्दीचा सन्मान करण्यात आला आहे.

यावर बोलताना सुरेश वाडकरांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचा मला आनंद झाला. लता दीदी आणि आशा ताईंचे माझ्यावर आर्शिवाद आहेत. संगीतकारांमुळे मी इथवर पोहचू शकलो असे सांगत सुरेश वाडकरांनी आपला आनंद व्यक्त केला.

2007 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून सुरेश वाडकर यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. 2011 मध्ये वाडकरांना ‘मी सिंधुताई सपकाळ’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच मध्यप्रदेश सरकारने सुरेश वाडकरांना प्रतिष्ठित ‘लता मंगेशकर पुरस्कराने’ गौरवले गेले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –