Coronavirus : देशात ‘कोरोना’ विळखा घट्ट ! सलग तिसर्‍या दिवशी 50 हजारांवर रुग्ण

पोलिसनामा ऑनलाईन – देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सलग तिसर्‍या दिवशी 50 हजारहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मागील 24 तासांत देशभरात तब्बल 52 हजार 050 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 803 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18 लाख 55 हजार 746 झाली आहे. यात 5 लाख 86 हजार 298 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

इंडियन काउन्सिल ऑफ रिसर्चनुसार देशात आतापर्यंत 2 कोटी 8 लाख 64 हजार 750 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. काल एकाच दिवसात तब्बल 6 लाख 61 हजार 182 लोकांची चाचणी करण्यात आली. कोरोना संक्रमितांच्या संख्येत भारत, अमेरिका आणि ब्राझील जगातील तीन सर्व प्रभावित देश आहे. मात्र यात भारतातील परिस्थिती चांगली आहे. भारताचा मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. भारतापेक्षा अधिक प्रकरणे अमेरिका आणि ब्राझीलमध्ये आहेत.