Coronavirus : ‘कोरोना’च्या संक्रमणाचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक ! देशात गेल्या 24 तासात 83883 नवे पॉझिटिव्ह तर 1043 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : कोरोना संसर्ग अनियंत्रित होत असल्याचे दिसत आहे आणि मागील 24 तासात देशात कोरोना व्हायरसची जितकी प्रकरणे समोर आली आहेत तेवढी एका दिवसात कधीही आलेली नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार बुधवारी सकाळी देशात 8 वाजल्यापासून गुरूवारी 8 वाजेपर्यंत कोरोना व्हायरसची विक्रमी 83883 नवी प्रकरणे समोर आली आहेत. देशभरात एका दिवसात कोरोना व्हायरसची इतकी प्रकरणे कधीही आली नव्हती. नव्या प्रकरणांसह आता देशात एकुण कोरोना व्हायरस प्रकरणांचा आकडा वाढून 38,53,406 झाला आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरण्यासह तो लोकांच्या मृत्यूचेही कारण होत आहे. यामुळे होणार्‍या मृत्यूंचा आकडाही वाढत चालला आहे. मागील 24 तासादरम्यान देशात कोरोनामुळे 1043 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या व्हायरसमुळे देशात एकुण 67376 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना व्हायरसचा मृत्यूदर कमी होऊन 1.74 टक्केपर्यंत आला आहे.

मात्र, कोरोना व्हायरसच्या बाबतीत काही दिलासादायक बाबी सुद्धा आहेत. यामध्ये बरे होणार्‍या लोकांची संख्या सुद्धा वेगाने वाढत आहे आणि मागील 24 तासात देशात कोरोना व्हायरस संसर्गातून 68584 लोक बरे झाले आहेत. देशभरात आतापर्यंत 2970492 लोक बरे झाले आहेत, सध्या देशात कोरोना व्हायरसच्या अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांबाबत बोलायचे तर सुमारे 8.15 लाख अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. कोरोना व्हायरसचा रिकव्हरी रेट देशात 77.08 टक्के आहे.

बुधवारी कोरोना टेस्टने नवा रेकॉर्ड केला आहे, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) आकड्यांनुसार बुधवारी देशभरात एकुण 11.72 लाखपेक्षा जास्त कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत, ज्या आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वात जास्त टेस्ट आहेत. देशभरात आतापर्यंत एकुण 4.55 कोटींपेक्षा जास्त कोरोना टेस्ट झाल्या आहेत.