रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! तिकिटापासून ते खान्यापिण्यापर्यंत सर्व तक्रारींसाठी हा नंबर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेने आपल्या प्रवाशांना आता आणखी सोई देण्याचा विचार करत नवी सुविधा दिली आहे. रेल्वे तिकिट, जेवन, चोरी पासून अनेक रेल्वे संबंधित तक्रारींसाठी तुम्ही तुमची तक्रार दाखल करु शकतात. १३९ हेल्पलाइन नंबरवर या सर्व तक्रारी तुम्हाला करता येणार आहे. ही सुविधा रेल्वेने प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी दिली आहे.

याआधी या नंबर वरुन फक्त तिकिटासंबंधित माहिती देण्यात येत होती, तर रेल्वेकडून इतर सुविधासाठी वेगवेगळ्या हेल्पलाइन उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. मात्र आता या एकाच हेल्पलाईनवरुन तुम्ही सर्व तक्रारी दाखल करु शकतात. यात तुम्ही रेल्वे स्टेशनवर होणारी छेडछाड, चोरी किंवा गुन्हे यासंबंधित तक्रारी आता तुम्ही रेल्वेच्या या नंबरवर करु शकतात. यासाठी रेल्वे सुरक्षा बल (RPF) व जीआरपीकडून देखील हेल्पलाईन उपलब्ध आहेत.

सर्व तक्रारी एकच हेल्पलाइन –

अशातच जेवण व तिकिट यासंबंधित प्रकरणांसाठी आयआरसीटीसीची हेल्पलाईलन आहे. याच्या ईमेल, एसएमएस व ट्विटर वर देखील तक्रार दाखल करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करुन दिली आहे. परंतू याच सर्व हेल्पलाइनला एकाच मंचावर आणण्यासाठी आणि प्रवाशांना आपल्या तक्रारी दाखल करता याव्यात यासाठी रेल्वेने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ग्राहक सेवा प्रतिनिधीकडे करा तक्रार –

या हेल्पलाइन १३९ वर संपर्क साधल्यावर विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यावर तुम्ही रेल्वे सुरक्षा, आरोग्य, जेवण, भ्रष्टाचार, दुर्घटना यासंबंधित तक्रार दाखल करता येणार आहे. यावेळी ग्राहक सेवा प्रतिनिधीशी तुम्ही बोलू शकतात.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like