आता सिंगल मेल पॅरेंट घेऊ शकतात चाइल्ड केयर लीव्हची सुविधा, मुलांच्या देखभालीसाठी सुटी घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले की, अशा सरकारी पुरूष कर्मचार्‍यांना आता मुलांची देखभाल करण्यासाठी सुटी घेण्याचा अधिकार आहे, जे एकटे पालक आहेत. त्यांनी म्हटले की, सिंगल मेल पॅरेंटमध्ये असे कर्मचारी सहभागी आहेत जे अविवाहित, विधुर किंवा घटस्फोटीत आहेत. सरकारी कर्मचार्‍यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी हे मोठे पाऊल आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, यासंबंधीचा आदेश काही दिवसांपूर्वीच जारी करण्यात आला होता, परंतु काही कारणामुळे तो जास्त चर्चेत आला नाही.

लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशनचा सुद्धा फायदा
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले की, चाइल्ड केयर लीव्ह (उउङ) वर असताना कर्मचार्‍याला हवे असल्यास तो लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन (ङढउ) चा सुद्धा फायदा घेऊ शकतो. कर्मचारी पहिल्या वर्षी सर्व पेड लीव्ह चाइल्ड केयर लीव्ह म्हणून वापरू शकतात. नंतर पुढल्या वर्षी 80 टक्के पेड लीव्ह चाइल्ड केयर लीव्ह म्हणून वापरू शकतील. सोबतच पॅरेंट्स आता आपल्या दिव्यांग मुलांच्या देखभालीसाठी चाइल्ड केयर लीव्ह घेऊ शकतात. यासाठी मुलांच्या वयाची कोणतीही मर्यादा नाही. अगोदर यासाठी मुलाची कमाल वय मर्यादा 22 वर्ष ठरली होती.

पुरुष सैन्य कर्मचार्‍यांना सुद्धा चाइल्ड केयर लीव्ह
केंद्र सरकारने मागच्या वर्षी चाइल्ड केयर लीव्हचा फायदा सिंगल पुरुष सैन्य कर्मचार्‍यांसाठी देण्यास मंजूरी दिली होती. यापूर्वी सीसीएल केवळ सुरक्षा दलात महिला अधिकार्‍यांनाच दिली जात होती.

सीसीएल घेण्यासाठी 40 टक्के अपंगत्व असणार्‍या मुलांच्या बाबतीत 22 वर्षांची वयोमर्यादा हटवण्यात आली होती. सोबतच एकाच वेळी सीसीएल घेण्याचा किमान कालावधी 15 दिवसांऐवजी कमी करून पाच दिवस केला होता. यामुळे सिंगल पुरुष सैन्य कर्मचारी सीसीएलचा लाभ घेऊ शकतात. सिंगल पुरुष सैन्य कर्मचारी आणि संरक्षण दलातील महिला अधिकारी सुद्धा 40 टक्के अपंगत्व असलेल्या मुलांच्या प्रकरणात सीसीएलची सुविधा घेऊ शकतात आणि यासाठी मुलांच्या वयाची कोणतीही मर्यादा नाही.

You might also like