एकट्याने कार तसेच सायकल चालवताना ‘मास्क’ परिधान करण्याची गरज नाही : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे एकट्या व्यक्तीने कार चालवताना किंवा सायकल चालवताना मास्क घालावा, अशी कोणतीही मार्गदर्शक सूचना जारी केलेली नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सचिव राजेश भूषण यांनी माहिती दिली आहे.

‘गाडी चालवताना किंवा एकट्याने सायकल चालवताना मास्क घालावा, अशी कोणतीही मार्गदर्शक सूचना सरकारने दिलेली नाही. पण जर समूहाने सायकलिंग, व्यायाम किंवा जॉगिंग करत असाल तर मास्क घालणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणेही बंधनकारक आहे. व्यायामाच्या बाबतीत नागरिकांमध्ये जागरूकता वाढली असून नागरिक दोन किंवा तिघांच्या गटात सायकल चालवताना किंवा जॉगिंग करताना दिसत आहेत. जर तुम्ही सायकल चालवत असाल किंवा समूहाने जॉगिंग करत असाल तर एकमेकांना संसर्ग होऊ नये म्हणून मास्क घालावा आणि सोशल डिस्टन्सिंगही राखावं’, असेही भूषण म्हटले आहे. कार चालवताना मास्क न घातल्यास वाहतूक पोलीस किंवा आरोग्य पथके दंड आकारत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून हे उत्तर देण्यात आले आहे.