2 ऑक्टोबरपासून प्लॅस्टिकपासून बनलेल्या ‘या’ 6 वस्तूंवर बंदी ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2 ऑक्टोबरपासून देशभरात प्लॅस्टिकपासून बनवलेल्या पिशव्या, कप आणि स्ट्रॉ यांसारख्या वस्तूंवर बंदी येण्याची शक्यता आहे. शहरे आणि खेड्यांमध्ये पूर्नवापर न होणाऱ्या (Single Use) प्लॅस्टिकच्या वापरामुळे भारत जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये गणला जातो. 2022 पर्यंत देशात पूर्नवापर न होणारे प्लॅस्टिक पूर्णपणे संपवण्याचे उद्दीष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. त्यानुसार गांधी जयंतीपासून प्लॅस्टिकच्या बनवलेल्या 6 वस्तूंवर बंदी घालण्याची मोहीम सुरू करू शकतात.

या वस्तूंवर येणार बंदी –

प्लॅस्टिक पिशव्या, कप, प्लेट्स, छोट्या बाटल्या, स्ट्रॉ आणि काही निवडक प्रकारच्या सॅशे (प्लॅस्टिकच्या पुड्या ) यांवर बंदी आणली जाऊ शकते. पूर्नवापर न होणाऱ्या प्लॅस्टिक वापरावर बंदी तसेच त्या वस्तूंच्या उत्पादनावर व आयातीवरही बंदी घालण्यात येईल.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सहा पूर्नवापर न होणाऱ्या वस्तूंवर बंदी घातल्यानंतर भारताचा वार्षिक प्लॅस्टिक वापर 5-10 टक्क्यांनी कमी होईल. म्हणजेच सुमारे 14 दशलक्ष टन प्लॅस्टिकचा वापर कमी होईल. प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यास सुरूवातीच्या सहा महिन्यानंतर दंड आकरणे सुरू होईल देशातील काही राज्यांनी आधीच पॉलिथीन पिशव्यांवर बंदी घातली आहे.

स्वतंत्रदिनी केली होती घोषणा –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित करतांना 2 ऑक्टोबर 2019 रोजी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशातील जनतेला प्लॅस्टिकचा वापर बंद करण्यास सांगितले. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

एअर इंडियामध्ये प्लॅस्टिक बंदी –

सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाकडून २ ऑक्टोबर पासून विमानांमध्ये पूर्नवापर न होणाऱ्या (Single Use) प्लॅस्टिकवर बंदी आणली जात आहे. पहिल्या टप्प्यात एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एलायंस एअरच्या विमानांमध्ये या निर्णयाची अमंलबजावणी केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात एअर इंडियाच्या सर्वच विमानांमध्ये अशा प्लॅस्टिकवर बंदी असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like