Single Use Plastic Ban | ‘या’ तारखेपासून बॅन होतंय सिंगल यूज प्लास्टिक, जाणून घ्या कोण-कोणत्या वस्तू होतील बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Single Use Plastic Ban | केंद्र सरकार 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिक बॅन (Single Use Plastic Ban) करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 2018 मध्ये म्हटले होते की, सरकार 2022 पर्यंत सिंगल यूज प्लास्टिकपासून देशाची सुटका करणार आहे. पर्यावरण मंत्रालयाने (Ministry of Environment) जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिक बॅन करण्याची अधिसूचना (notification) जारी केली आहे, यामध्ये कोण-कोणत्या वस्तू बॅन होतील हे नमूद केले आहे.

या तारखेपासून असेल बंदी
सिंगल यूज प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे सरकारने 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लॉस्टिक बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जुलै 2022 च्या नंतर देशात सिंगल यूज प्लास्टिकद्वारे तयार होणार्‍या वस्तू स्टॉकमध्ये ठेवणे आणि विकणे यावर बंदी असेल.

 

या वस्तू होतील बॅन

इयर बड्स आणि प्लास्टिक स्टिक (Ear buds and plastic stick)

फुग्यांची प्लास्टिक स्टिक (Plastic stick of balloons)

प्लास्टिक झेंडे (Plastic flags)

कँडी स्टिक आणि आईस्क्रिम स्टिक (Candy stick and ice cream stick)

सजावटीसाठी पॉलीस्टाईनिन (थर्माकोल / thermocol)

प्लेट, कप, ग्लास, चमचे, चाकू आणि ट्रे सारखी प्लास्टिक भांडी (Plastic utensils like plates, cups, glasses, spoons, knives and trays)

मिठाईचे डब्बे, निमंत्रण कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेट भवती गुंडाळलेले प्लास्टिक (Plastic wrapped around candy boxes, invitation cards and cigarette packets)

100 मायक्रॉनपेक्षा कमीचे प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर (Plastic or PVC banner less than 100 microns)

प्लास्टिक कॅरी बॅगसाठी हा नियम (This rule for plastic carry bags)
तसेच पर्यावरण आणि जलवायु परिवर्तन मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, प्लास्टिक कॅरी बॅगची जाडी 30 सप्टेंबर 2021 पासून 50 मायक्रॉनवरून वाढवून 75 मायक्रॉन आणि 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉनपर्यंत जाईल. मात्र, कंपोस्टेबलची जाडी ठरवलेली नाही परंतु विक्रीसाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाची परवानगी घ्यावी लागेल.

Web Titel :- Single Use Plastic Ban | single use plastic going to be banned from this date

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Taliban Got Amrullah Salehs Treasure | तालिबानला मिळाला अमरुल्लाह सालेहचा खजिना, जाणून घ्या एकुण किती किंमत?

Pune Corporation | 11 गावांच्या प्रारुप विकास आराखड्यास 6 महिने मुदतवाढ ! प्रस्ताव मान्यतेसाठी शहर सुधारणा समितीपुढे

MPSC | राज्यसेवा मुख्य परीक्षा 4, 5 आणि 6 डिसेंबरला मुंबई-पुण्यासह ‘या’ 6 जिल्हा केंद्रावर होणार