पुणे: पोलीसनामा ऑनलाईन – बुधवारी (9 नोव्हेंबर) रोजी पुण्यातील (Pune) चाकण (Chakan) जवळील संग्रामदुर्ग किल्ल्यावरील (Sangramdurga Fort) अतिक्रमण हटवण्यात आले होते. आता त्या पाठोपाठ, ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे असलेल्या किल्ले सिंहगडाचे (Sinhagad Fort) सौंदर्य अबाधित राखण्यासाठी वनविभागाने सिंहगडाच्या (Sinhagad Fort) आसपासची सर्व अतिक्रमणे हटवली आहे. सिंहगड किल्ल्याच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत विविध जागी स्थानिकांनी अतिक्रमण (Encroachment) करून विविध प्रकारची दुकाने, स्टॉल आणि झोपड्या काढल्या होत्या.
वनविभागाने (Forest Department) कारवाई करत हे सर्व स्टॉल, दुकाने आणि झोपड्या काढून टाकल्या आहेत. बहुतेक दुकाने ही तेथील स्थानिक नागरिकांची असून ते उदरनिर्वाहासाठी (Survival) या दुकानांवर विसंबून आहेत. त्यामुळे स्टॉल धारकांची निसर्ग पर्यटन योजनेअंतर्गत सोय करण्याचा विचार वनविभाग करत आहे. अशी माहिती पुणे वन विभागाने दिली आहे.
अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत ज्यांची कोणाची दुकाने आणि स्टॉल काढले गेले आहेत,
त्यांचा रोजगाराचा प्रश्न वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून स्थानिक नागरिक यांच्या समविचाराने
सोडविण्यात आला आहे, अशीही माहिती पुणे वन विभागाने दिली आहे.
तत्सम कायदेशीर पद्धतीने नोटीस देऊन पुणे वनविभागाने अवैध झोपड्या हटवल्या आहेत. अतिक्रमण हटवल्यानंतर वाहनतळाची (Parking Space) जागा वाढली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध होणार असून, सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर (Sinhgad) होणारी वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे, असे उपवनसंरक्षक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
Web Title :- Sinhagad Fort | forest department action on encroachment in sinhagad fort area
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sachin Vaze | सचिन वाझेंना जामीन मंजूर; पण, …
MSRTC | एसटी महामंडळाने पगारी रजांसंदर्भात घेतला मोठा निर्णय