Sinhagad Fort | गेल्या चार दिवसांत 25 हजार पर्यटक सिंहगडावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन दिवाळीच्या सुट्टीमध्ये (Diwali holiday) अनेक पर्यटक विविध स्थळांना भेटी देत असतात. पुण्यातील सिंहगडावर (Sinhagad Fort) देखील दिवाळीच्या सुट्टीत अनेकांनी भेट दिली आहे. दिवाळी सुरु झाल्यानंतर शेवटच्या चार दिवसांमध्ये सिंहगडावर (Sinhagad Fort) सुमारे 25 हजारांहून अधिक पर्यटकांनी (Tourists) भेट दिली आहे. या चार दिवसांमध्ये 3 हजार 311 दुचाकी व 1 हजार 833 मोटारी गडावर आल्या होत्या.

 

वाहनातून आलेले पर्यटकांची मोजणी करताना दुचाकीने 2, तर चारचाकीने 5 पर्यटक गेले असे मोजतात.
मोटारी एवढेच पर्यटक वडापमधून (खाजगी वाहनाने) गेल्याचे मोजले जाते.
त्यानुसार दिवाळीत गुरुवारी (दि.4) लक्ष्मीपूजनच्या दिवशी 232 दुचाकी व 104 मोटारी वडाप असे दीड हजार पर्यटक सिंहगडावर (Sinhagad Fort) आले होते.
त्यानंतर शुक्रवारी पाडव्याच्या दिवशी 848 दुचाकी व 533 मोटारी वडाप अशातून सुमारे 6 हजार 733 पर्यटक गडावर आले होते.

 

तर शनिवारी भाऊबीजच्या दिवशी 915 दुचाकी व 553 मोटारीने वडापमधून 6 हजार 542 पर्यटकांनी गडाला भेट दिली.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली होती. रविवारी 1280 दुचाकी व 643 मोटारी, वडाप अशा वाहनातून सुमारे 8 हजार 275 पर्यटक गडावर आले होते.

 

दिवाळीच्या शेवटच्या चार दिवसात 22 हजार 924 पर्यटक गडावर गेले. सिंहगडला जाताना डोणजे (Donje) मार्ग आहे.
यामध्ये कोंढणपूर (Kondhanpur) मार्गे चार दिवसात आलेल्या पर्यटकांचा समावेश आहे.
कोंढणपूर मार्गे चार दिवसात 3 हजार पर्यटक आले असे गृहीत धरले तर चार दिवसात सिंहगडावर 25 हजार पर्यटकांनी हजेरी लावली होती.

 

Web Title : Sinhagad Fort | Last four day near about 25 thousand tourist visit sinhagad fort pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Whatsapp Verification ID | बदलणार आहे का Whatsapp? जर दिला नाही ऑफिशियल आयडी तर ब्लॉक होईल अकाऊंट

Modi Government | मोदी सरकारकडून पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर ! Pension च्या वाढीवर लवकरच निर्णय

Anti Corruption Bureau Mumbai | 3 लाखाच्या लाच प्रकरणी नवी मुंबई महापालिकेतील लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात