सिंहगड इन्स्टिट्यूटच्या कर्मचाऱ्यांनी राज्यपालांकडे मागितले इच्छामरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील नामांकित सिंहगड इन्स्टिटयूट मधील कर्मचारी एका वेगळ्याच कारणामुळे त्रस्त आहेत. या  कर्मचाऱ्यांचा प्रश्न इतका गंभीर झाला आहे कि सिहंगड इन्स्टिटयूटच्या कर्मचाऱ्यांनी चक्क राज्यपालांकडे इच्छामरण मागितले आहे. गेल्या १८ महिन्यांपासून इथल्या कर्मचाऱ्यांना पगार दिला गेला नाही त्यामुळे त्रस्त कर्मचाऱ्यांनी हे मोठे पाऊल उचलले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गेल्या १८ महिन्यांपासून या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन दिले गेलेले नाही. त्यामुळे सर्व  कर्मचाऱ्यांनी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याकडे इच्छामरण मागितले आहे. राज्यपालांकडे दिलेल्या पात्रात कर्मचाऱ्यांनी नमूद केले आहे कि,याबाबत कर्मचाऱ्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली होती. खुद्द न्यायालयाने पगार देण्याचे आश्वासन संस्थेला दिले होते. पण संस्थेने त्या आदेशाला देखील जुमानले नाही. आणि शेवटी पगार दिलाच नाही.गेल्या १८ महिन्यांपासून पगार न दिल्याने कर्मचारी मोठ्या मानसिक तणावात आहेत. आता आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

संस्था न्यायालयाच्या आदेशाला देखील जुमानत नाही…
सिंहगड संस्थेतील कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन मिळावे याकरिता गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयात धाव घेतली होती. हा खटला बरेच दिवस सुरु होता. शेवटी न्यायालयाने कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्याचे आदेश संस्थेला दिले होते. मात्र न्यायालयाचा आदेश देखील संस्थेने धुडकावला. अजूनदेखील कर्मचाऱ्यांचे वेतन दिलेले नाही.

गेल्या १८ महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे त्रस्त कर्मचाऱ्यांनी उपोषण देखील केले होते . मात्र संस्थेकडून त्याची दखल देखील घेतली गेलेली नाही. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार वेतन न दिलेल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. काही जणांचे कर्जाचे हप्ते थकीत आहेत. तर काही जणांच्या मुलांच्या शाळेच्या फीज भरल्या गेलेल्या नाहीत . त्यामुळे हे कर्मचारी मानसिक तणावाखाली आहेत.

संस्थेचा मनमानी कारभार…
संस्थेचे कर्मचारी पाटोळे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की,आम्ही आमच्या नेहमीच्या कामकाजापेक्षा जास्त काम केले होते. परंतु आम्हाला वेतन मिळाले नाही. आता संस्था काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. तर काहींना लोणावळा येथील संस्थेत बदली करून पाठवले जात आहे. तेही पगार न देता केले जात आहे. त्यामुळे आम्ही कर्मचारी सध्या प्रचंड मानसिक तणावात आहोत असे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

 

 

Loading...
You might also like