Sinhagad Road Flyover | पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे नितीन गडकरींच्या हस्ते भूमिपूजन (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sinhagad Road Flyover | केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलाचे (Sinhagad Road Flyover) भूमीपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, नव्याने होणारा हा उड्डाणपुल बहुमजली करा. तसेच, मेट्रोसाठी (Metro) देखील तरतूद करावी, त्याचे नियोजित निधीतच ही तरतूद करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. सिंहगड रोडवर राजाराम पूल ते फनटाईम थिएटर (Funtime Theater) दरम्यान हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे.

 

 

 

 

यावेळी (Sinhagad Road Flyover) पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar), विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Dr. Nilam Gorhe), खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat), भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), स्थानिक आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal), भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir), मुक्ता टिळक (Mukta Tilak), महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol), पुणे शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik), स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane), सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar), स्थानिक नगरसेवक प्रसन्न घनःश्याम जगताप (Prasanna Ghanshyam Jagtap), ज्योती किशोर गोसावी (Jyoti Kishore Gosavi), मंजूषा दिपक नागपुरे (Manjusha Deepak Nagpure), श्रीकांत शशिकांत जगताप, बाबा मिसाळ यासह प्रभाग क्र.30 आणि 33 मधील नगरसेवक महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 

 

सिंहगड रोडवर ननव्याने बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलाची लांबी 2.5 किलोमीटर आहे.
यासाठी 135 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या उड्डाणपूलामुळे वडगाव धायरी,
नऱ्हे, किरकिटवाडी, खडकवासला, पानशेत, सिंहगड आदी भागातील नागरिकांना जाण्यासाठी उपयुक्त होणार आहे.
यामुळे सिंहगड रोडवर होणारी वाहतुक कोंडी सुटणार आहे. विठ्ठलवाडी, विश्रांतीनगर, हिंगणे,
आनंद नगर, माणिक बाग तसेच माणिक बाग डीपी रस्ता या चौकातील वाहतूक पुलाच्या खालच्या बाजूने जाईल.
तर उर्वरित सर्व वाहतूक पुलावरुन जाईल.

Web Titel :- Sinhagad Road Flyover | bhumipujan flyover on sinhagad road by nitin gadkari (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | राष्ट्रवादी नगरसेवकाच्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याकडून 13 लाखांचा अपहार

Zilla Parishad Election | ZP, पंचायत समिती पोट निवडणुका ठरल्याप्रमाणे होणार – इलेक्शन कमिशन

UPSC Final Result 2020 | सिव्हिल सर्व्हिसेस 2020 चा रिझल्ट लागला, शुभम कुमार ने केले टॉप, टीना डाबीच्या बहिणीने 15वी रँक मिळवली