Pune wall collapse : सिंहगड रोडवर काही ठिकाणी कोंढव्या सारखीच परिस्थिती, प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नैसर्गिक नाला बुजवून त्यावर अनधीकृत बांधकाम केल्यामुळे सिंहगड रोड येथील सोसायटीमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. यामुळे सोसायटीतील इमारती आणि संरक्षण भिंतींना धोका निर्माण झाला आहे. पालिकेला निवदेन देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, लवकरात लवकर यावर उपाय योजना केली नाही तर या ठिकाणीही कोंढवासारखी परिस्थिती उद्भवू शकते असे पाश्चिमा रेसीडेंन्सीचे चेअरमन मधुकर पाटील यांनी सांगितले.

सिंहगड रोड येथील पाश्चिमा रेसीडेन्सीच्या आजूबाजूला असलेल्या चर्च आणि सोसायटींनी नैसर्गिक नाला बंद करून त्यावर अतिक्रमण केले आहे. नैसर्गिक नाला बंद करून त्यामध्ये पाईप टाकण्यात आले आहेत. मात्र, पालिकेकडून नाल्याची साफसफाई केली जात नसल्यामुळे पाईपमधून पाणी जात नाही. त्यामुळे परिसरातील सोसायाट्यांचे घाण पाणी पाश्चिमा सोसायटीत शिरत आहे. या ठिकाणी पाणी साचल्यामुळे संरक्षण भिंत आणि बिल्डींगच्या पायाला धोका निर्माण झाला आहे. तसेच दुर्गंधीयुक्त पाणी सोसायटीच्या पार्किंगमध्ये साठल्याने या ठिकाणच्या लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच हे पाणी लाईट मिटरच्या बोर्डापर्यंत पोहचल्याने धोका होण्याचा संभव आहे.

परिसरातील चर्च, सोसायटी आणि शाळा यांनी संरक्षण भिंत बांधून नाला बुजवून टाकला आहे. त्यामुळे यातून वाहणारे पावसाचे पाणी, सांडपाणी सोसायटीमध्ये शिरत आहे. आमदार माधुरीताई मिसाळ आणि नगरसेवक श्रीकांत जगताप यांनी त्याठिकाणची पाहणी केली. त्यानंतर महापालिकेकडे त्याबाबत तक्रार केली गेली. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या ठिकाणच्या नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.

पेरूची पाने आरोग्यासाठी फायदेशीर, ‘असा’ करा उपयोग 

पुरुषांच्या या समस्येची ‘ही’ आहेत प्रमुख ८ कारणे, घ्यावी ‘अशी’ काळजी 

केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्ता गुणकारी 

कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब, दलित मतदार आकर्षित होणार?

‘वंचित’मुळे राहूल गांधींची कॉंग्रेस नेत्यांवर ‘आगपाखड’