Sinhagad Road Pune Crime News | मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मुलीच्या नावाने अकाउंट, सिंहगड रोडवर कोयत्याने वार करत हल्ला (CCTV Video)

Sinhagad Road Pune Crime News | Account in girl's name to avenge friend's murder, knife attack on Sinhagad Road (CCTV Video)
ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sinhagad Road Pune Crime News | शहरात गुन्हेगारीने पुन्हा तोंड वर काढले आहे. सातत्याने गुन्ह्यांच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता सिंहगड रस्त्यावर आज (दि.४) सकाळी कोयत्याने तरुणावर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Sinhagad Road Pune Crime News

पूर्ववैमन्यासातून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सागर चव्हाण असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदर घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.(Sinhagad Road Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात पुण्यातील डहाणूकर कॉलनी परिसरात एकमेकांकडे बघितल्यावरून दोन गटात भांडण झाले होते. त्याचवेळी एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात त्याचा मृत्यू देखील झाला होता. श्रीनिवास वतसलवार असे या तरुणाचे नाव होते. ज्या तरुणांनी श्रीनिवास वर हल्ला केला त्यापैकी सागर चव्हाण एक होता.

आज किरकटवाडी भागात सागर चव्हाणला एका मित्राने बोलावून घेतलेले होते. दरम्यान दोघा जणांकडून त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये सागर चव्हाण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे.

सागर चव्हाण याला मारण्यासाठी आरोपींनी एक अनोखा प्लॅन तयार केला होता.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी आरोपींनी सोशल मीडियावर एका मुलीच्या नावाने अकाउंट तयार केले होते.
या अकाउंट वरून सागरला अनेक मेसेज देखील करण्यात आले होते. आपल्याशी रोज बोलत असल्यामुळे सागर या अकाउंटच्या प्रेमात पडला होता.

हे अकाउंट आरोपी चालवत असल्याची कुठलीही कुणकुण त्याला लागली नव्हती. महिनाभर चॅटींग केल्यानंतर आज आपण भेटू असे सागरला सांगण्यात आले. आज सकाळी सागर याला भेटायला बोलावले आणि त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर शरद पवारांकडून पत्ते उघड? म्हणाले, “विधानसभा निवडणुकीनंतर …”

Bibvewadi Pune Crime News | दिव्यांग आयुक्त असल्याचे भासवून दिव्यांगाला 39 लाखांना गंडा

Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | आता चिंचवडच्या आखाड्यात शरद पवार राजकीय डाव टाकणार? बडा नेता तुतारी फुंकण्याच्या तयारीत?

Sharad Pawar NCP | पक्षातल्या इन्कमिंगवर शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले – “त्या लोकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही तयारच आहोत,पण …”

Total
0
Shares
Related Posts