Sinhagad Road Pune Crime News | पुणे : इन्स्टाग्रामवर ओळख झाली, धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sinhagad Road Pune Crime News | इंस्टाग्राम या सोशल मीडियावरील ओळखीतून तरुणी आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. एका तरुणाने 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत इंन्स्टाग्रामवर ओळख (Instagram Friend) केली. तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. आरोपीने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार (Minor Girl Rape Case Pune) केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाला सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) अटक केली आहे.(Sinhagad Road Pune Crime News)

याबाबत 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने गुरुवारी (दि.30) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तात्रय बाबुराव शिंदे Dattatraya Baburao Shinde (वय-22 रा. तुकाईनगर, वडगाव, पुणे) याच्यावर आयपीसी 376/3, 376/2/एन, 354, 323, 506, पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पिडीत मुलीची फेब्रुवारी 2023 मध्ये इंन्स्टाग्रामवर ओळख झाली.
आरोपीने मुलीसोबत ओळख वाढवली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन
तिला धमकी देऊन लगट केले. मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊ घरी येऊन तिच्यासोबत जबरदस्तीने
शारीरिक सबंध ठेवले. तसेच तिला धमकी देऊन सिहंगड किल्ला (Sinhagad Fort) परिसरात नेऊन अत्याचार केले.
पिडीत मुलीने त्याला नकार दिला असता आरोपीने तिला मारहाण करुन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत
नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr L N Danwade – Kalyani Nagar Accident | तातडीने जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाचे सदस्य डॉ. एल एन धनवडे वादाच्या भोवऱ्यात; ‘निबंध’ चांगलाच भोवणार

Warje Malwadi Pune Crime News | पुणे : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला डिझेल टाकून पेटविले, पतीवर खुनाचा गुन्हा दाखल