Sinhagad Road Pune Crime | पुणे : प्रेमसंबंधाचा गैरफायदा! गर्लफ्रेंडला न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले पैसे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sinhagad Road Pune Crime | तरुणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा (Love Affair) गैरफायदा घेऊन एकाने तिचे न्युड फोटो (Nude Photos) व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले. (Extortion Case) तसेच वारंवार पैशांची मागणी करुन पैसे दिले नाहीतर मारुन टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना फेब्रुवारी 2022 ते 13 एप्रिल 2024 या कालावधीत वडगाव पठार (Vadgaon Pathar) येथे घडली आहे. याप्रकरणी उदगीर तालुक्यातील (Udgir Taluka) आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत 34 वर्षीय युवतीने शनिवारी (दि.13) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन विशाल केरबा मोतीरावे
Vishal Kerba Motirawe (रा. जिल्हा परिषद शाळे जवळ, गल्ली नं.2 ता. उदगीर जि. लातुर – Latur) याच्यावर आयपीसी 354(क), 354(ड), 384, 387, 504 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. आरोपीने प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेऊन फिर्यादी यांना व्हॉट्सअॅप वर व्हिडीओ कॉल (Whatsapp Video Call) केला.
फिर्यादी यांना नग्न होण्यास सांगून नकळत फिर्यादी यांचे स्क्रीन रेकॉर्डींग व स्क्रीनशॉट काढले.
आरोपीने फिर्यादी यांच्या नावाचे बनावट अकाउंट तयार करुन त्यावर फिर्य़ादी यांचे न्युड फोटो पोस्ट करुन बदनामी करण्यास सुरुवात केली.

तसेच न्युड अवस्थेतील व्हिडीओ कॉलची स्क्रीन रेकॉर्डींग व स्क्रीनशॉट फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन
50 रुपये ऑनलाईन मागणी केली. फिर्यादी यांनी घाबरून त्याला चार हजार रुपये फोन पे वरुन पाठवले.
मात्र, आरोपी वारंवार पैशांची मागणी करु लागला. तसेच पैसे दिले नाहीतर मारुन टाकण्याची धमकी दिली.
आरोपीने सतत फिर्यादी यांना फोन करुन शिवीगाळ करत पैशांची मागणी केली.
आरोपीच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे याबाबत तक्रार केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राघवेंद्रसिंह क्षीरसागर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त