सिंहगड करंडक क्रिकेट स्पर्धेचे महापौर मुरलीधर मोहोळ , आ. भिमराव तापकीर यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वडगाव बुद्रुक येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानावर सिंहगड करंडक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे भव्य शुभारंभ पुणे शहराचे प्रथम नागरिक मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आला.

सदर स्पर्धा ओपन गट आणि ४० पेक्षा जास्त वयोगट अशी खेळवली जाणार असून ओपन गटात ६० तर ४० वय पेक्षा जास्त गटात २० संघाने सहभाग नोंदवला आहे. विजेत्यांना भव्य चषक आणि रोख पारितोषिक देण्यात येणार असून सर्व सामन्यांचे युट्युब वर थेट प्रेक्षेपण करण्यात येणार आहे. स्पर्धेचे आयोजन भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे उपाध्यक्ष नगरसेवक हरिदास चरवड यांनी केले आहे

यावेळी नगरसेविका नीताताई दांगट, भाजपा खडकवासला विधानसभा अध्यक्ष सचिनभाऊ मोरे, स्वीकृत नगरसेवक गंगाधर भडावळे, रासप पुणे शहर महिला अध्यक्षा आनंदी जोशी, बाळासाहेब जाधव, अनंतदादा दांगट, जेष्ट पत्रकार विकास वाळुंजकर, अविनाश चरवड, बजरंगनाना दांगट, हरिदास लगड, पत्रकार राजेंद्रकृष्ण कापसे, मिलिंद पानसरे, रमाकांत देशमुख,भानुदास दांगट, बजरंग चरवड, बाबूतात्या चरवड, रामदास लभडे, जयवंत निपुणगे, चंद्रकांत पवळे, कैलास येवले, उमेश बामगुडे, प्रकाश चरवड, केदार जाधव, दशरथ मणेरे, संजय पवळे, श्रीकांत पवळे, आकाश लोणारे, सागर दांगट, विनायक सैदाणे, किशोर (बाळा) दांगट, हेमंत चरवड, सुनिल कांबळे, प्रमोद कोळेकर, प्रकाश निम्हण, अभिजित आढाव, सोनू जाधव, बंडूशेठ नलावडे, संजय दांगट, युवराज जाधव, अनंता पासलकर, सिद्धेश पाटील, स्वप्नील चरवड, विकास कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

सलामीचा सामना बेळगाव क्रिकेट संघ विरुद्ध किरकटवाडी क्रिकेट क्लब यांच्यात रंगला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना किरकटवाडी क्रिकेट क्लब संघाने निर्धारित ४ षटकात सचिन हगवणेच्या आक्रमक ३२ धावांच्या योगदानाच्या जोरावर विजयासाठी बेळगाव क्रिकेट संघ संघापुढे ४९ धावांचे आवाहन ठेवले फलंदाजीच्या प्रतिउत्तरादाखल मैदानात उतलेल्या बेळगाव क्रिकेट संघ संघास निर्धारित ४ षटकात ३८ धावापर्यंतच मजल मारता आली.