Sinus Problem : बदलत्या हवामानात सायनसच्या समस्येने आहात त्रस्त, तर ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळेल आराम

पोलीसनामा ऑनलाइन – दिवसा गरमी तर कधी रात्री थंडी. कधी कडकडीत उन तर कधी अचानक पाऊस. हवामानात सातत्याने असे बदल होत आहेत. सध्या अचानकच हवामान बदलत आहे. अशावेळी आजारपण येणे सहाजिकच आहे. हवामानाच्या या बदलाचा मनुष्याच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. बदलत्या हवामानात लोकांना सर्दी-तापाचा त्रास होतो. हंगामी आजारांच्या बाबतीत संवेदनशील लोकांची सायनसची समस्या सुद्धा वाढते.

सायनसच्या आजाराची सुरूवात अ‍ॅलर्जी आणि सर्दी-खोकल्याने होते. अनेकदा सायनस असल्याचे समजत नाही, आणि आपण यास नाकबंद होणे समजतो. सायनसच्या समस्येत बहुतांश लोक औषध, इन्हेलर इत्यादी घेतात. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का, सायनसच्या समस्येवर घरगुती उपायसुद्धा परिणामकारक ठरू शकतात? आज आपण असेच काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

संसर्ग, अ‍ॅलर्जी, सर्दी-ताप आणि केमिकल इरिटेशनमुळे सायनस होऊ शकतो. यामध्ये अनेक समस्या होऊ शकतात :
1 चेहर्‍यावर नरमपणा, ताप
2 कान आणि दातांमध्ये वेदना
3 नाकातून श्वास घेण्यास त्रास
4 घशात खवखव
5 चेहर्‍यावर सूज

घरगुती उपाय

1 वाफ घ्या
सायनसच्या समस्येत नेहमी नाकातून पाणी येत राहाते. अशावेळी स्टीम म्हणजेच वाफ घेणे खुपच लाभदायक ठरते. एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि टॉवेलचा वापर करत तोंड झाकून घ्या. गरम पाण्याची वाफ जसजशी नाकात जाईल, तुमचे नाक पूर्णपणे खुले होईल. स्टीमने तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही यामध्ये विक्स, पुदीन्याची पाने इत्यादी सुद्धा टाकू शकता.

2 गरम पेय पदार्थ
सायनसची समस्या असेल तर गरम पेयाचे सेवन केल्याने आराम मिळतो. गरम पेय प्यायल्याने नाक उघडते. आयुर्वेदिक चहा किंवा काढा जास्त लाभदायक आहे. सायनसच्या समस्येत अल्कोहल घेणे नुकसानकार ठरू शकते. हे चुकूनही घेऊ नका.

3 चेहर्‍यावर गरम टॉवेल ठेवा
सायनसमध्ये नेहमी नाक बंद होते, ज्यामुळे डोके जड झाल्यासारखे वाटते. अशावेळी गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळून घ्या, आणि नंतर या टॉवेलने चेहरा झाकून घ्या. यामुळे आराम मिळेल.

4 योग्य आराम
अनेक तास बैठे काम करणार्‍यांची सायनसची समस्या आणखी वाढते. सायनसच्या समस्येतून लवकर आराम मिळण्यासाठी जास्तीत जास्त आराम केला पाहिजे.