SIP Calculation | केवळ 5000 रुपये करा मासिक गुंतवणूक, दरमहिना मिळतील 35000 रुपये; पहा कॅलक्युलेशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SIP Calculation | निवृत्तीनंतर खर्चाची चिंता सर्वांनाच असते, याच कारणामुळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. जर तुम्ही आतापर्यंत निवृत्तीचे नियोजन केले नसेल, तर आजच करा, कारण नोकरीनंतर मासिक सॅलरी मिळणे बंद होईल. निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून मोठी रक्कम मिळण्यासाठी काही खास गुंतवणुकींबाबत जाणून घेवूयात. (SIP Calculation)

 

SWP द्वारे पेन्शनची व्यवस्था
जर तुम्हाला विना जोखीम गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही SIP पेक्षा वेगळ्या SWP म्हणजे सिस्टमॅटिक विथड्रॉअल प्लानवर विचार करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला दर महिना पेन्शन म्हणून मोठी रक्कम मिळेल. या अंतर्गत तुम्ही 20 वर्षापर्यंत दरमहिना 5 हजार रुपयांची मंथली एसआयपी केली तर तुम्हाला दरमहिना 35 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.

 

सिस्टमॅटिक विथड्रॉअल प्लान (SWP) म्हणजे काय ?
सिस्टमॅटिक विथड्रॉअल प्लान (SWP) द्वारे गुंतवणुकदार एक ठराविक रक्कम म्युच्युअल फंड योजनेतून परत मिळवतात. किती वेळात किती पैसे काढायचे आहेत, हे गुंतवणुकदार स्वताच ठरवतो. SWP अंतर्गत हे पैसे रोज, विकली, मंथली, तिमाही, सहामाहीला किंवा वार्षिक आधारावर काढता येऊ शकतात. गुंतवणुकदाराला हवे असल्यास केवळ एक ठराविक रक्कम काढणे किंवा गुंतवणुकीवर कॅपिटल गेन्स काढू शकतात. (SIP Calculation)

सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (SIP)
येथे एकदाच तुमचे पूर्ण पैसे ब्लॉक होत नाहीत. उलट यामध्ये तुम्ही तुमच्या सुविधेने मंथली गुंतवणूक करू शकता. सोबतच वेळोवेळी रिटर्नचे मूल्यांकन करून एसआयपी वाढवणे किंवा कमी करण्याची सुद्धा सवलत मिळते.

20 वर्षापर्यंत SIP
मासिक SIP – 5000 रुपये
कालावधी – 20 वर्ष
अंदाजित रिटर्न – 12 टक्के
एकुण व्हॅल्यू – 50 लाख रुपये

 

आता SWP साठी हे 50 लाख रुपये वेगवेळ्या योजनेत टाकले तर अंदाजित रिटर्न 8.5 टक्के असेल, आणि तुम्हाला मासिक 35 हजार रुपये पेन्शन म्हणून मिळतील.

20 वर्षाची SWP
वेगवेगळ्या स्कीममध्ये गुंतवणूक – 50 लाख रुपये
अंदाजित रिटर्न – 8.5 टक्के
वार्षिक रिटर्न – 4.25 लाख रुपये
मासिक रिटर्न – 4.25 लाख/12= 35417 रुपये

 

SWP चे फायदे  

एसडब्ल्यूपी रेग्युलर विथड्रॉअल आहे.
याद्वारे स्कीममधून युनिट्सचे रिडम्पशन होते.
जर ठरलेल्या वेळेनंतर सरप्लस पैसे झाले तर ते तुम्हाला मिळतात.
यामध्ये तसाच टॅक्स लागेल जसा इक्विटी आणि डेट फंडच्या बाबतीत लागतो.
जिथे होल्डिंगचा कालावधी 12 महिन्यांपेक्षा जास्त नाही. तिथे गुंतवणुकदारांना शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो.
जर एखाद्या योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुम्ही त्यामध्ये एसडब्ल्यूपी पर्याय अ‍ॅक्टिव्हेट करू शकता.

 

Web Title :- SIP Calculation | swp will give 35000 monthly by investing 5000 for 20 years in mutual funds see sip swp calculation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा