प्रत्येक महिन्याला 4500 रुपयांच्या बचतीमधून सुद्धा बनू शकता करोडपती, फक्त ‘ही’ बनवा रणनिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : कमी उत्पन्न असणारे आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा विचार करत आहेत. जर तुम्हाला छोट्या गुंतवणुकीतून मोठी बचत करायची असेल तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. तज्ज्ञ सांगतात, सीपद्वारे जास्त रिटर्न मिळवायचे असेल तर मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करा. बहुतांश जाणकार सीपचा कम्पाऊंड लाभ घेण्यासाठी 15 ते 20 वर्षापर्यंत गुंतवणुकीचा सल्ला देतात.

गुंतवणुकदार 15 ते 20 वर्षांसाठी गुंतवणूक करत असेल तर शेवटी रक्कमेत वाढ होण्याचा रेट जास्त होतो आणि अशाप्रकारे त्यास मोठे रिटर्न मिळते.

सुमारे 20 वर्ष गुंतवणूक केली तर यावर सरासरी 15 टक्के रिटर्नची अपेक्षा करता येते. मात्र, हे यावर निर्भर करते की, कोणती एसआयपी पॉलीसी निवडली आहे. जर योग्य वेळी एसआयपी निवडली तर 15 टक्के रिटर्न सहम मिळू शकते.

करोडपती होण्यासाठी सीपमध्ये कशी गुंतवणूक केली पाहिजे त्याचे उदाहरण जाणून घेवूयात…
समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला एखाद्या एसआयपीमध्ये 4,500 रुपयांची गुंतवणूक करत आहात आणि यावर 15 टक्के रिटर्नची अपेक्षा आहे. तुम्ही ही गुंतवणूक 20 वर्षांसाठी मेली आहे. एसआयपी कॅलक्युलेटरच्या मदतीने यावर मिळणारे एकुण रिटर्न बाबत जाणून घेतले तर 20 वर्षांच्या अखेरीस तुम्ही 68,21,797.387 रुपयांचे मालक बनू शकता. मात्र, येथे एका ट्रिकच्या मदतीने तुम्ही यास 1 कोटीमध्ये रूपयांमध्ये बदलू शकता.

जर तुम्ही या एसआयपीमध्ये प्रत्येक वर्षानंतर प्रति महिना 500 रुपयांचे टॉप अप वाढवलेत तर तुम्ही सहजपणे करोडपती बनू शकता. जर तुम्ही या ट्रिकचा वापर केला तर सुरूवातीच्या प्रत्येक महिन्याला 4,500 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला 20 वर्षानंतर मॅच्युरिटीच्या वेळी 1,07,26,921.405 रुपये देऊ शकते.