सेव्हींग करा अन् जमवा तब्बल 1 कोटी, ‘या’ स्कीममध्ये दरमहा करा ‘एवढी’ गुंतवणूक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला एक कोटी रुपयाची बचत करायची असेल तर त्यासाठी तुम्ही आत्तापासूनच सुरुवात करा. यासाठी सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनची (SIP) मदत घेऊ शकता. दरम्यान तज्ज्ञांच्या मते 1 कोटीची रक्कम जमवणं कठिण असले तरी, SIP बचत करून एक कोटी रुपये जमवले जाऊ शकतात. SIP च्या माध्यमातून गुंतवणूकदार दरमहा म्युच्युअल फंड योजनांमध्ये निश्चित रक्कम जमा करतात. ही रक्कम बऱ्याच काळासाठी जमा केली जाते. अशा परिस्थितीत SIP द्वारे आपले लक्ष साध्य करणे सोपे जाते आणि शेवटी आपल्याला चांगला परतावा मिळतो.

म्युच्युअल फंड गुंतवणूकीचे प्लॅटफॉर्म असलेल्या Scripbox च्या मते, गुंतवणूकीच्या रकमेवर व्याज चक्रवाढ व्याजातून वाढते. 1 कोटीची बचत करणारे गुंतवणूकदार गुंतवणूकीच्या चक्रानुसार ही रक्कम बदलू शकतात.

7 हजाराच्या बचतीनं पूर्ण होऊ शकतं लक्ष्य
Scripbox च्या मते दरमहा सात हजार रुपयाची बचत झाल्यानंतर SIP मार्फत 20 वर्षात 1 कोटी रुपयाची रक्कम मिळू शकते. यासाठी म्युच्युअल फंडावर मिळणारा SIP परताव्याचा दर 10 टक्के मानला जातो. Scripbox चे सहसंस्थापक प्रतीक मेहता यांनी सांगितल, याचा अर्थ असा नाही की, ही रक्कम कमी किंवा अधिक होऊ शकत नाही. गुंतवणूकीसाठी घेतलेला वेळ दीर्घकालीन नफा किंवा तोटा रद्द करू शकतो आणि परताव्याचा दर सुसंगत बनवू शकतो. दरम्यान, SIP मार्केटमधील चढ-उतारांवर सरासरी नफा मिळतो.

10 वर्षातही होऊ शकता कोट्याधिश
जर तुम्हाला दहा वर्षात एक कोटीची बचत करायची असेल तर तुम्हाला दरमहा 33 हजार रुपयाची बचत करावी लागेल. जर तुम्ही ही रक्कम सगल 10 वर्षे 10 टक्के दराने गुंतवणूक केली तर तुम्हाला परतावा म्हणून एक कोटी रुपये मिळू शकतात. आपण आपल्या गुंतवणूकीच्या लक्ष्याचा अंदाज घेऊ इच्छित असाल तर आपण Scripbox च्या SIP कॅल्क्युलेटरची मदत घेऊ शकता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like