SIP in Mutual Funds | 45 वर्षाच्या वयात करोडपती बनून व्हाल निवृत्त ! केवळ 177 रुपये रोज करा बचत; जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SIP in Mutual Funds | करोडपती होण्यासाठी निवृत्तीपर्यंत का थांबायचे, आजकाल Early Retirement चा ट्रेंड आहे. सध्याची तरुण पिढी बचत आणि सेवानिवृत्तीच्या नियोजनाबाबत (Retirement Planning Calculator) खूप जागरूक आहे, त्यांना वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत काम करायचे नाही, तर 45 किंवा 50 वर्षांनी नोकरी सोडून आयुष्यभर आरामात जगण्यासाठी पुरेसे पैसे जमा करायचे आहेत. (SIP in Mutual Funds)

 

45 व्या वर्षी कसे बनावे करोडपती
जर तुमचीही असाच विचार करत असाल, तर तुम्ही आजपासून म्युच्युअल फंडात (Mutual Funds) गुंतवणूक करायला सुरुवात करावी, कारण पारंपारिक लहान बचत योजनांद्वारे तुम्ही तुमची मोठी उद्दिष्टे साध्य करू शकणार नाही, यासाठी तुम्हाला थोडीशी जोखीम पत्करावी लागेल.

 

जर तुम्हाला वयाच्या 60 ऐवजी 45 व्या वर्षी निवृत्त व्हायचे असेल, तर तुम्हाला गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळणे आवश्यक आहे, यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो. कारण तुम्ही तरुण असताना जास्त धोका पत्करू शकता.

 

तुम्हाला वयाच्या 45 किंवा 50 व्या वर्षी 1 कोटी किंवा 2 कोटींचा निधी गोळा करायचा असेल तर तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागतील. (SIP in Mutual Funds)

 

1. तुम्हाला वयाच्या 20-30 व्या वर्षी गुंतवणूक सुरू करावी लागेल

2. उत्पन्न वाढवण्याबरोबरच गुंतवणूकही वाढवावी लागेल

 

तुम्ही तरुण असताना तुमच्यात जोखीम घेण्याची क्षमता जास्त असते. आपल्यापैकी बहुतेकजण वयाच्या 20 व्या वर्षी काम करू लागतात किंवा कमावू लागतात. तुम्ही त्याच वयापासून रु. 500 नी म्युच्युअल फंडात डखझ सुरू करू शकता. हळूहळू ते वाढवत रहा. ही दीर्घकालीन गुंतवणूक असल्याने शेअर बाजारातील अस्थिरतेचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. साधारणपणे, इक्विटी म्युच्युअल फंड (Equity Mutual Funds) दीर्घ कालावधीत 12-15 टक्के रिटर्न देतात.

उदाहरण क्रमांक 1
जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी एसआयपी सुरू केली असेल आणि वयाच्या 45 व्या वर्षी 1 कोटी रुपये कमावण्याचे उद्दिष्ट असेल, तर तुम्हाला एसआयपीमध्ये महिन्यासाठी 11,000 रुपये गुंतवावे लागतील म्हणजेच दिवसासाठी 367 रुपये बचत करून ते गुंतवावे लागतील. म्युच्युअल फंडात 20 वर्षांच्या कालावधीत सरासरी 12 टक्के परतावा मिळतो.

 

वय – 25 वर्षे

सेवानिवृत्ती – 45 वर्षे

गुंतवणुकीचा कालावधी – 20 वर्षे

मासिक गुंतवणूक – रु. 11,000

अंदाजे रिटर्न – 12 टक्के

गुंतवणुकीची रक्कम – रु. 26.4 लाख

एकूण रिटर्न – रु. 83.50 लाख

एकूण रक्कम – रु. 1.09 कोटी

 

उदाहरण क्रमांक 2
समजा तुमचे वय 30 वर्षे आहे आणि तुम्हाला वयाच्या 45 व्या वर्षी निवृत्त व्हायचे असेल, तर तुम्हाला एसआयपीमध्ये दररोज 663 रुपये म्हणजेच दरमहा रुपये 19900 जमा करावे लागतील. त्यामुळे तुम्ही 45 वर्षांचे झाल्यावर तुमच्या हातात 1 कोटी रुपये असतील. आता तुम्ही 25 वर्षांच्या ऐवजी 30 वर्षांत गुंतवणूक सुरू करत असाल, तर तुमच्या गुंतवणुकीची रक्कमही जवळपास दुप्पट झाली आहे परंतु अंतिम रक्कम फक्त 1 कोटी रुपयेच आहे. तुम्ही जितक्या उशीरा सुरू कराल तितका तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा कमी मिळेल.

 

वय (Age) – 30 वर्षे.

सेवानिवृत्ती (Retirement) – 45 वर्षे.

गुंतवणुकीचा कालावधी (Duration Of The Investment) – 15 वर्षे.

मासिक गुंतवणूक (Monthly Investment) – रु. 19,900.

अंदाजे रिटर्न (Approximate Returns) – 12 टक्के.

गुंतवणुकीची रक्कम (Amount Of Investment) – रु. 35.82 लाख.

एकूण रिटर्न (Total Returns) – रु. 64.59 लाख.

एकूण रक्कम (Total Amount) – 1 कोटी रु.

उदाहरण क्रमांक 3
समजा तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षीच गुंतवणूक करायला सुरुवात केली तर काय होईल? अशा स्थितीत, तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी 25 वर्षांचा दीर्घ कालावधी असेल, तुम्ही कंपाऊंडिंगचा जबरदस्त फायदा घेऊ शकाल. वयाच्या 45 व्या वर्षी 1 कोटी रुपये मिळविण्यासाठी, तुम्हाला 5300 रुपयांची मासिक एसआयपी करावी लागेल म्हणजेच दररोज 177 रुपये वाचवावे लागतील. म्हणजेच, तुम्ही जितका जास्त उशीर कराल तितके जास्त पैसे तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी खर्च करावे लागतील.

 

वय – 20 वर्षे.

सेवानिवृत्ती – 45 वर्षे.

गुंतवणुकीचा कालावधी – 25 वर्षे.

मासिक गुंतवणूक – रु. 5300.

अंदाजे रिटर्न – 12 टक्के.

गुंतवणुकीची रक्कम – रु. 15.90 लाख.

एकूण रिटर्न – रु. 84.67 लाख.

एकूण रक्कम – 1 कोटी रुपये.

 

Web Title :- SIP in Mutual Funds | sip calculation retire in early age of 45 as crorepati save rs 177 per day and invest in sip

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

DA Arrear | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! मार्च 2022 च्या सॅलरीसोबत मिळेल 38,692 रुपयांचा एरियर

 

Coronavirus in Maharashtra | दिलासादयक ! राज्यात नव्याने आढळणारी रुग्ण संख्या 2 हजारांहून कमी, गेल्या 24 तासात 11,408 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

PMC Election 2022 | पुणे महापालिका निवडणूक ! प्रारुप प्रभाग रचनांवर हरकतींचा ‘पाऊस’, तब्बल 3 हजार 596 नागरिकांच्या हरकती व सूचना; वानवडी- रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयात सर्वाधीक हरकती