SIP Mutual Fund | मुलीचा विवाह करायचा असो किंवा निवृत्तीचा प्लान बनवायचा असो, SIP Formula मध्ये आहेत सर्व उपाय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SIP Mutual Fund | भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण पै-पै गोळा करतो. निश्चितपणे ही बचत तुमची स्वप्न पूर्ण करण्यात काही ना काही मदत करते. परंतु हीच बचत योग्य बचत फंड्समध्ये गुंतवल्यास तुम्ही मोठ्यात मोठी आर्थिक लक्ष्य पूर्ण करूशकता. (SIP Mutual Fund)

 

म्युच्युअल फंड्स गुंतवणुकीचा एक असा पर्याय आहे जिथे तुम्ही छोट्या-छोट्या रक्कमेतून मोठी संपत्ती जमा करूशकता. बाजाराच्या जोखीमदरम्यान म्युच्युअल फंड चांगला रिटर्न देऊ शकतो. (SIP Mutual Fund)

 

जर तुमच्या आर्थिक लक्ष्यासाठी 5 किंवा 7 वर्षाचा कालावधी असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुक सुरूकरूशकता. 5 ते 7 वर्षाच्या गुंतवणुकीवर म्युच्युअल फंडमधून तुम्हाला 12 ते 15 टक्के वार्षिक रिटर्न मिळू शकतो.

 

म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी (SIP Mutual Fund Investment) च्या माध्यमातून दर महिना छोट्या-छोट्या रक्कमेची गुंतवणूक करता येऊ शकते.

 

सुरू करा गुंतवणूक
जर तुम्ही अजूनपर्यंत गुंतवणूक सुरू केलेली नाही तर ताबडतोब सुरू करा. कारण शेयर बाजार (Share Market) मध्ये जोखीम जास्त आहे आणि बँकांमध्ये रिटर्न नाहीच्या बरोबर आहे.

सोने-चांदी किंवा जमीन खरेदी करू शकत नाही. अशावेळी जर तुम्ही बचतीचा एक भाग दर महिना म्युच्युअल फंड (Mutual Funds) मध्ये गुंतवला तर येत्या काळात हा खुप मोठा आधार होऊ शकतो.

 

दिनेश पाठक 35 वर्षाचे आहेत. 15 वर्षानंतर त्यांना मुलीचे उच्च शिक्षण आणि विवाहासाठी किमान एक कोटी रुपयांची गरज असेल. याशिवाय 25 वर्षानंतर त्यांचे रिटायर्मेंट सुद्धा येईल, यासाठी सुद्धा त्यांना सुमारे दोन कोटी रुपयांची गरज असेल.

 

अवलंबा हा फार्म्युला
15x15x15 फॉर्म्युला वापरून (15x15x15 Rule in Mutual Funds) अवघ्या 15 वर्षात करोडपती कसे बनता येईल ते जाणून घेवूयात. यासाठी दरमहिना 15 वर्षापर्यंत 15 हजार रुपये महिना म्युच्युअल फंडमध्ये SIP करावे लागतील. या गुंतवणुकीवर 15 टक्के व्याज मिळाले पाहिजे.

 

या गुंतवणुकीवर 15 वर्षानंतर एकुण 1,00,27,601 रुपये (एक कोटीपेक्षा जास्त) मिळतील. 15 वर्षात एकुण गुंतवणुक 27 लाख रुपये होईल, ज्यावर बंपर 73 लाख रुपये व्याज मिळेल.

 

रिटायर्मेंट प्लान
आता पाळी आहे निवृत्तीची. निवृत्तीसाठी (retirement plan) सुद्धा दिनेश यांना वेगळे आणि आतापासून 15 हजार रुपये महिना एसआयपीच्या फॉर्म्युलावर काम करावे लागेल. म्हणजे त्यांना आतापासून 30,000 रुपये महिना एसआयपी सुरू करावी लागेल.
या एसआयपीच्या मदतीने दिनेश आपली दोन्ही टार्गेट पूर्ण करू शकतात. (SIP Mutual Fund)

 

तुम्ही विचार करत असाल की 27 लाख रुपयांवर 73 लाख रुपये व्याज, हे कसे शक्य आहे.
परंतु हे शक्य आहे. कारण, SIP मध्ये कम्पाऊंडिंग फाम्युला म्हणजे चक्रवाढ व्याज जमा होते.
सुरुवातीला गुंतवणुकीवर व्याज मिळते, नंतर व्याजावर व्याज मिळते.

 

Web Title :- SIP Mutual Fund | sip mutual fund investment plan crorepati kaise bane money making investment tips

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Temperature | राज्यात रात्रीचा गारवा वाढण्याची शक्यता, तापमानात घट

Devendra Fadnavis | ‘काही संकुचित वृत्ती देशाला ‘त्या’ मार्गावरून खाली उतरविण्याचा प्रयत्न करतात’ (व्हिडिओ)

DGP Sanjay Pandey | पोलीस महासंचालक संजय पांडेंनी आरोप फेटाळले, म्हणाले – ‘परमबीर सिंह यांनी प्रकरण संपवण्यासाठी…’