दररोज 18 रूपयांची ‘बचत’ करा अन् ‘मिळवा’ 77 लाख रूपये, खुपच फायद्याचा ‘हा’ प्लॅन, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : महागाईच्या या युगात आपल्या कुटूंबाच्या गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. बर्‍याच वेळा आपण बचत केलेले पैसेदेखील काही कारणास्तव खर्च केले जातात. अश्या परिस्थिती स्वतःच्या गरजदेखील पूर्ण करता येत नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार बँका मुदत ठेवींवरील (FD) व्याज दर कमी करीत आहेत. या परिस्थिती अशी एक योजना आहे, ज्याद्वारे तुम्ही दररोज १८ गुंतवणुकीवर ७७ लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा करू शकता. अनेक नागरिकांनी या योजनेत गुंतवणूक केली आहे. जाणून घेऊया या योजनेसंदर्भात…

जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये दररोज १८ रुपये म्हणजेच एक महिन्यासाठी ५४० रुपये गुंतवले, तर तुम्हाला केवळ ३० वर्षांत ७७.४ लाख रुपयांचा निधी मिळू शकेल. अनेक म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकदारांना एका वर्षात १८ टक्के परतावा मिळाला आहे. जर तुम्ही एसआयपीमध्ये ३० वर्षांसाठी दरमहा ५४० रुपयांची गुंतवणूक केली आणि दरवर्षी १८ टक्के परतावा मिळतो. तसेच या योजनेत तुम्ही १ लाख ९४ हजार रुपये गुंतवू शकता, तर १८ टक्के रिटर्ननुसार ३० वर्षानंतर तुम्हाला ७७.४ लाख रुपये मिळतील. अशा प्रकारे आपण एक मोठा नफा मिळवू शकता.

SIP चे कार्य :

तुम्ही सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP) गुंतवणूक करून चक्रवाढव्याजचा फायदा देखील घेऊ शकता, म्हणजेच पहिल्या महिन्याचा नफा तुमच्या पुढच्या महिन्याच्या प्रिन्सिपलमध्ये जोडला जाईल, ज्यामुळे तुमची गुंतवणूक वाढेल आणि तुमचा नफाही वाढेल. जितका जास्त वेळ तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवाल तितका जास्त फायदा तुम्हाला मिळू शकेल. म्हणून एसआयपीमार्फत दीर्घकाळ गुंतवणूक केल्याने संपत्ती जमा होण्यास मदत होते.

एसआयपी नियमितपणे गुंतवणूक करण्याचा एक सोपा आणि विश्वासार्ह मार्ग आहे, त्या अंतर्गत आपण दरमहा ५०० रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकता. म्हणजे आपण आपल्या मासिक खर्चावर कोणत्याही अतिरिक्त ओझे न बाळगता आपली स्वप्ने पूर्ण करू शकता. जरी गुंतवणूकीची रक्कम कमी असेल, तर दीर्घकाळ हळूहळू निधी जमा करण्याची एसआयपी ही एक सोपी प्रणाली आहे.

Visit : Policenama.com