डॉन ब्रॅडमनची 71 वर्षापुर्वीची रंगीबेरंगी फुटेज ‘व्हायरल’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कायमच महान खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या सर डॉन ब्रॅडमन यांचे 71 वर्षापूर्वीचे फुटेज ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल फिल्म अँड साऊंड आर्किव ऑफ ऑस्ट्रेलिया ने जाहीर केले आहे. NFSA ने आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या या फुटेजमध्ये ब्रॅडमन 26 फेब्रुवारी 1949 रोजी एफ किप्पेक्स आणि डब्ल्यूए ओल्डफील्ड यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) खेळत आहे.

एएफएसएने म्हटले आहे की, 16 एमएमच्या या फुटेजला जॉर्ज होब्स यांनी शूट केले असल्याचे म्हंटले आहे. ज्यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान एसीबी माहिती विभागात कॅमेरापर्सन म्हणून काम केले आणि नंतर एबीसी टीव्हीवर होते. 66 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आवाज नाही, परंतु एससीजीवर 41,000 दर्शक पाहिले जाऊ शकतात.

दरम्यान, सर डॉन ब्रॅडमनने त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीत एकूण 52 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यांनी 6996 धावा केल्या. या दरम्यान त्यांनी 29 शतके आणि 13 अर्धशतके झळकावली होती. त्यांची सरासरी 99.94 होती जो एक जागतिक विक्रम आहे. 11 जुलै 1930 रोजी लीड्समधील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यांनी एकाच दिवसात 309 धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या एका दिवसात फलंदाजाने सर्वाधिक धावा केल्या आहेत. यासोबतच कोणत्याही एका देशाविरूद्ध 5000 हून अधिक धावा करण्याचा विक्रम सर डॉन ब्रॅडमनच्या यांच्या नावावर आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध एकूण 5028 धावा केल्या. त्याच वेळी, 1930 च्या आशियायी मालिकेदरम्यान त्यांनी 974 धावा केल्या. ब्रॅडमनने आपल्या कारकीर्दीत 12 दुहेरी शतके केली. हे रेकॉर्ड अद्याप अबाधित आहे. 2009 मध्ये त्यांना आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले.

शेवटच्या कसोटी सामन्यात करियर अ‍ॅव्हरेजला 100 पर्यंत नेण्यासाठी ब्रॅडमन यांना फक्त चार धावांची आवश्यकता होती. इंग्लंडविरुद्धच्या त्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे अनुभवी ब्रॅडमन दुसरा चेंडू खेळत बोल्ड झाले. कसोटी कारकीर्दीत ब्रॅडमन 7000 धावा करण्यासही चुकले. शेवटी त्यांनी 52 कसोटी सामन्यांमध्ये 99.94 च्या सरासरीने 6996 धावांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ब्रॅडमनने कसोटी क्रिकेटमध्ये 29 शतके आणि 13 अर्धशतके ठोकली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डॉन यांनी 234 सामन्यात 95.14 च्या सरासरीने 28067 धावा केल्या,117 शतके आणि 69 अर्धशतकं त्याच्या नावावर केली. क्रिकेटच्या या राजाने वयाच्या 92 व्या वर्षी 25 फेब्रुवारी 2001 रोजी अखेरचा श्वास घेतला.