‘सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है’ ! ठाकरे सरकारवर निशाणा साधत अमृता फडणवीसांनी केलं ट्विट

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या विविध मुद्द्यांवरुन समाजमाध्यमात चर्चेत असतात. आताही एका ट्विटमुळे अमृता फडणवीस चर्चेत आल्या आहेत.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अमृता फडणवीस यांनी एक फोटो ट्विट केला आहे. त्यात त्यांच्या चेहऱ्यावर केक लावलेला दिसत आहे. ट्विटच्या कॅप्शनमध्ये “सिर्फ कुछ दाग अच्छे लागते है,” असे त्यांनी लिहले आहे.

९ एप्रिल रोजी अमृता फडणवीस यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने चाहते आणि शुभचिंतकांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल अमृता फडणवीस यांनी आभार व्यक्त केले. तसेच, वाढदिवस साजरा करताना चेहऱ्यावर लावलेल्या केकचा फोटो त्यांनी ट्विट केला. मात्र, त्या फोटोवर लिहलेल्या कॅप्शनची समाजमाध्यमात जोरदार चर्चा सुरु आहे. ‘सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है’, अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या, रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्यावरुन राजकारण सुरु असताना अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरवरुन निशाणा साधला होता. “पहचान कौन? एक राजा जो- महल की चौखट से निकलता नही अवाम से कभी मिलता नही सत्य और कर्म की राह पर चलता नही वसूली के बिन उसका पत्ता हिलता नही महामारी का कहर उससे सम्हलता नही प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही ! सच है, धोखा कभी फलता नही। क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?”, असे हिंदीत ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते.