प्रियकरासोबत फरार होत होती बहिण, भावानं पाठलाग करून थांबवलं, त्यानंतर गमवला जीव

हरियाणा : वृत्तसंस्था – हरियाणाच्या पानिपतमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पानिपतमधील नामुंडा या गावात पुन्हा एकदा हत्या झाली आहे. खेड्यातल्याच एका प्रियकरासह बहीण फरार होती. तिचा पत्ता समजल्यानंतर तिच्या १८ वर्षाच्या भावाने तिचा पाठलाग केला, पण त्याला त्याचा जीव गमवावा लागला.

पाठलाग सुरू असताना बहिणीच्या प्रियकराने आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांना बोलावून रस्त्यात तिचा भाऊ वंशला निर्घृणपणे मारहाण केली आणि त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि काही तास रस्त्यावर पडला.

वंशच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोचले आणि त्याला दवाखान्यात घेऊन गेले आणि तेथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कुटुंबातील सदस्यांनी प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांवर मारहाण आणि विषारी पदार्थ खायला घालून खून केल्याचा आरोप केला आहे.

मृताचे काका प्रवीण म्हणाले की, नामुंडा गावात राहणाऱ्या वंशला आपल्या मोठ्या बहिणीचे कोणाशी तरी चुकीचे संबंध असल्याचा संशय आला. वंशने यापूर्वी दोन किंवा तीन वेळा आपल्या बहिणीला आणि तिच्या प्रियकराला समजावून सांगितले होते की, आम्ही इज्जतदार आहोत. असे करू नका. वंशच्या बहिणीने आणि तिच्या प्रियकराने वंशला धमकावले की, आमच्यात पडू नको, नाही तर तुला मारून टाकू.

गुरुवारी वंशची बहिण कॉलेजसाठी घराबाहेर पडली. ती कॉलेजला जात असल्याचे सांगत तिने घर सोडले. नामुंडा गावातून रिक्षात बसून ती प्रियकराच्या कॉलेजला गेली. वंशची बहीण जेव्हा शहरात पोचली, तेव्हा तिच्या प्रियकरासह पळून गेली.

काका म्हणाले की, वंशने आपल्या बहिणीला थांबवण्याचाही प्रयत्न केला, पण बहिणीने नकार दिला की ती त्याच्यासोबत जाईन. यामुळे वंश खूप चिंतेत होता. त्यांनी वंशला एक विषारी पदार्थ खायला घातला आणि त्याला मारहाण केली. त्यानंतर रुग्णालयात त्याचा जीव गेला.