दुर्दैवी ! चिमुकल्या बहिण- भावाचा नदीत बुडून मृत्यू, नागपूर जिल्ह्यातील घटना

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – खेळण्यासाठी नदी काठावर (On the river bank) गेलेल्या चिमुकल्या बहिण -भावाचा (Sister-brother) नदीत बूडून दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) देवळी सांगवी येथे रविवारी (दि. 13) दुपारी ही घटना घडली. या घटनेने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून गावावर शोककळा पसरली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

आरुषी (वय 10) आणि अभिषेक नामदेव राऊत (वय- 7) अशी या बहिण- भावांची (Sister-brother) नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, देवळी सावंगी येथील नामदेव राऊत आणि त्यांची पत्नी दोघेही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सुगीचे दिवस असल्याने नेहमीप्रमाणे ते दोघेही मजुरीसाठी शेतावर (On the farm for wages) गेले होते. आरुषी आणि अभिषेक ही दोन्ही मुले घरीच होती. दुपारी ते खेळण्यासाठी नदीच्या काठावर गेले. तेंव्हापासून हे दोघेही बेपत्ता होते. सायंकाळी पाचच्या सुमारास आई कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना दोन्ही मुले दिसली नाहीत. त्यांनी इकडे तिकडे शोधाशोध केली. सायंकाळपर्यंत वाट पाहिली. पण तोपर्यंत मुसळधार पाऊस (rain) सुरू झाला. त्यामुळे मुले कोणाच्यातरी घरी असतील, असा विचार करून त्यांनी रात्र काढली. तरीही मुले सोमवारी सकाळपर्यंत परत न आल्याने नामदेव राऊत यांनी हिंगणा पोलीस स्टेशन (Hingna Police Station) मध्ये धाव घेत मुले हरवल्याची तक्रार दिली.

दरम्यान, नदीकाठावर मुलांचे कपडे आणि चपला दिसल्याचे गावातून एक जण सांगत आला. आई – वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली असता आपल्याच मुलींची कपडे असल्याचे त्यांनी ओळख पटविली. त्यानंतर नदी पात्रात शोध घेतला. त्यावळी सोमवारी दुपारी दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले. या घटनास्थळाचा पंचनामा करून हिंगणा पोलिसांनी दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. हिंगणा पोलीस तपास करत आहेत.

Wab Title :- sister and brother drowned in river at nagpur

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

फुफ्फुसांची होतेय समस्या ! कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता

मुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा केवळ 95 रुपये आणि मिळतील 14 लाख, जाणून घ्या कसे?

इस्त्रायलमध्ये नवीन सत्ता ! 12 वर्षानंतर बेंजामिन नेतन्याहू यांना निरोप, नफ्ताली बेनेट बनले नवीन पंतप्रधान

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा