उसने घेतलेले पैसे वेळेत देता न आल्याने, सख्या बहिणींनी केले विष प्राशन

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – कृष्णानगर, चिखली येथे उसने घेतलेले पैसे वेळेत देता न आल्याने, देणेकऱ्यांनी लावलेल्या तगाद्याला कंटाळून दोन सख्या बहिणींनी विष प्राशन केले. यामध्ये एका बहिणीचा मृत्यू झाला.

मंगल गोकूळ नार्वेकर (६२) आणि अलका राजू बाबर (४५), दोघीही रा. जीमगेश बिल्डिंग, कृष्णानगर, चिंचवड, असे विष प्राशन केलेल्या दोन बहिणींची नावे आहेत. यापैकी मंगल नार्वेकर यांचा रविवारी उपचार दरम्यान मृत्यू झाला.

चिखली पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, या दोघी बहिणींनी कामासाठी पैसे घेतले होते. हे पैसे परत द्यावेत यासाठी काहीजणांनी दोघींकडे तगादा लावला होता. वारंवारच्या तगद्याला या दोघी कंटाळल्या होत्या. सततच्या या त्रासाला कंटाळून दोघींनी ६ मार्च रोजी सकाळी कोणतेतरी विषारी औषध प्राशन केले होते. प्रकृती गंभीर असल्याने उपचाराकरिता दोघींना वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र मंगल नार्वेकर यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये समोर आले आहे. तपास चिखली पोलिस करत आहे.